Tuesday, July 9, 2024

सपना चौधरीला टक्कर देणाऱ्या प्रांजल दहियाच्या गाण्याचा यूट्यूबवर राडा; गाठला १० कोटी व्ह्यूजचा टप्पा

सोशल मीडिया म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा आणि सोयीचा प्लॅटफॉर्म. इथे अनेक कलाकार त्यांच्या कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचवत असतात, आणि रसिक प्रेक्षक देखील इथे त्यांना त्यांच्या कामाबद्दल प्रतिक्रिया देतात. लग्न समारंभांमध्ये आजकाल आगरी कोळी गाण्यांसह डीजेवर धूम करणारी भोजपुरी गाणी देखील वाजवली जातात. प्रेक्षकांचा भोजपुरी गाण्यांमधील कल वाढत चालला आहे. त्याचबरोबर आता भोजपुरी कलाकारांमधील स्पर्धा देखील वाढत आहे. अशात आता प्रांजल दहियाचे एक गाणे सध्या चांगलेच गाजत आहे.

प्रांजल ही भोजपुरीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे ‘नाचूंगी डीजे फ्लोर पे’ हे गाणे यूट्यूबवर ३ जानेवारी २०२० ला प्रदर्शित झाले होचे. तिचे ’५२ गज का दामन’ हे हिट गाणे सर्वांच्याच परिचयाचे आहे. तिच्या ‘नाचूंगी डीजे फ्लोर पे’ या गाण्याला आतापर्यंत १० करोड ६९लाख इतके व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर तिच्या या गाण्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. प्रांजलची सर्वच गाणी यूट्यूबवच प्रदर्शित होतात. तिचे हे गाणे देखील यूट्यूबवर प्रदर्शित झाले होते. तब्बल ६ लाखांहून जास्त लाईक्स या गाण्याला मिळाले आहेत.

या गाण्याचे बोल आर.बी. गुजर यांनी लिहिलेले असून संगीत रियाझी यांनी दिले आहे, तर या गाण्याला अंजलीने तिचा आवाज दिला आहे. तसेच तिला गहल्यान सहाब यांनी आपल्या मधुर आवाजाची साथ दिली आहे. (Pranjal Dahiya’s Haryanvi song ‘Nachungi DJ Floor Pe’ created a buzz, 10 million views VIDEO)

प्रांजल सध्या आपल्या अभिनयाने आणि डान्सने सपना चौधरीला टक्कर देऊ पाहत आहे. ‘नाचूंगी डीजे फ्लोर पे’ या गाण्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा घागरा आणि गुलाबी रंगाची ओढणी परिधान केली आहे. तसेच तिने यामध्ये परिधान केलेल्या अलंकारांनी तिचे सौंदर्य आणखीनच खुलून आले आहे. तिच्या डान्सबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्रीच्या डान्सची बातच और आहे. तिच्या ठुमक्यांनी ती चाहत्यांच्या काळजावर घाव करते.

तिचा जन्म हरियाणा येथील फरीदाबादमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला डान्सची आवड होती. गेल्या तीन वर्षांपासून अभिनेत्री या क्षेत्रात कार्यरत आहे. तसं पाहिलं, तर खूप कमी कालावधीमध्ये तिने एवढे यश संपादन केले आहे. संगीतकार रेणुका पंवारबरोबर तिचे चांगलेच जमते. तिच्या अभिनयामुळे आणि डान्समुळे लवकरच ती यशाचं मोठं शिखर गाठेल, असे तिच्या चाहत्यांना वाटते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तब्बल ३६ वर्षांपूर्वी ‘या’ जाहिरातीत दिसला होता ‘भाईजान’; हँडसम लूक पाहून चाहते नव्याने पडतायेत प्रेमात

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

हे देखील वाचा