मराठी टेलिव्हिजनवरील अनेक मालिका सध्या ट्रेंडिंग आहेत. यातील झी मराठीवरील एक मालिका जोरदार चर्चेत आहे. ती मालिका म्हणजे ‘तुझी माझी रेशीमगाठ’ होय. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील कलाकार देखील चांगलेच चर्चेत आहेत. यामध्ये प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. यासोबत या मालिकेत असणारी चिमुकली अभिनेत्री या मालिकेचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. ती म्हणजे मायरा वैकुळ होय. मायराचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तसेच मालिकेतील मायरा आणि प्रार्थनाची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना भावत आहे. अशातच प्रार्थना आणि मायराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
प्रार्थनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून मायरासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या दोघीही मेकअप रूममध्ये बसलेल्या आहेत. तिथे मायरा मेकअप करत आहे. तसेच तिच्या मागे प्रार्थना उभी राहिलेली आहे. व्हिडिओमध्ये मायरा खूप सुंदर दिसत आहे. तिला प्रार्थना विचारते की, “लिपस्टिक लावलीस का? तुला जर कोणी विचारले तू लिपस्टिक लावलीस का तर काय सांगणार मग?” यावर मायरा म्हणते की, “मी सांगणार माझे ओठच असे आहेत.” व्हिडिओमध्ये दोघींची मस्त ड्रामेबाजी पाहायला मिळत आहे. (Prarthana behere and myra vaikul’s funny video viral on social media)
त्या दोघींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांचे अनेक चाहते तसेच कलाकार या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर गौतमी देशपांडे, अन्विता फलटणकर यांनी कमेंट केल्या आहेत. तसेच त्यांचे अनेक चाहते देखील या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
प्रार्थना बेहेरेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली. या मालिकेत तिने अंकिता लोखंडेच्या छोट्या बहिणीचे पात्र निभावले होते. या पात्राने ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले.
चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर तिच्या करिअरला असे काही वळण मिळाले की, केवळ ‘मितवा’ या एका चित्रपटाने तिला सर्वत्र प्रसिद्धी मिळाली. ‘मितवा’ या चित्रपटासाठी प्रार्थना ‘नाईन एक्स झकास हिरोइन’ या शोची विजेती स्पर्धक झाली होती. यानंतर तिने ‘व्हाट्सअप लग्न’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर एँड मिसेस सदाचारी’, ‘ती आणि ती’, ‘मस्का’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘फुगे’ या चित्रपटात काम केले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘दिसला गं बाई दिसला’, म्हणणाऱ्या ‘राजा राणीची गं जोडी’ फेम संजूचा गावरान अवतार भावला नेटकऱ्यांना
-सूरज पांचोलीला दिलासा, जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआयची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली