Wednesday, July 3, 2024

‘टू क्युटीज इन वन फ्रेम’, झी मराठी पुरस्कार सोहळ्यातील नेहा आणि परीचा मोहक फोटो व्हायरल

झी मराठी पुरस्कार सोहळा २०२१ नुकताच संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आपल्याला दररोज भेटायला येणाऱ्या कलाकारांना रोज पेक्षा वेगळ्या पोशाखात बघून चाहत्यांना देखील आनंद होत आहे. या वर्षीचा सोहळा काही खास असणार आहे. कारण या वर्षी झी मराठीवर तब्बल पाच नवीन मालिका आल्या आहेत.

या मालिकांनी अगदी एक-दोन महिन्याच्या कालावधीत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. त्यामुळे आता या वर्षी कोणाला पुरस्कार मिळणार आहेत. हे पाहण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. अशातच या पुरस्कार सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. यातील एक फोटो मात्र चांगलाच लक्षवेधी ठरत आहे. तो फोटो आहे प्रार्थना आणि मायरा यांचा. म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेहा आणि परीचा. (Prarthana behere and myra vaikul’s photo viral from zee marathi award function)

सोशल मीडियावर प्रार्थना बेहेरे आणि मायरा वैकुळ यांचा एक सुंदर फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मायराने सुंदर जांभळ्या रंगाचा लाँग ड्रेस घातला असून, प्रार्थनाने लाल जांभळ्या रंगाची घागरा चोली घातली आहे. तसेच कानात मोठे ईअरिंग ‌घातले आहेत. त्या दोघीही या फोटोमध्ये खूपच गोड दिसत आहेत. त्यांना पाहून ‘टू क्युटिज इन वन फ्रेम’ असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

https://www.instagram.com/p/CVBD8b0N9FT/?utm_medium=copy_link

हाती आलेल्या माहितीनुसार, या वर्षीचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार परीला मिळाला आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या प्रोमोपासून मायराने सगळ्यांचे मन जिंकले आहे. तसेच ही मालिका देखील खूप लोकप्रिय आहे.

मालिकेची कहाणी देखील वेगळी असल्याने प्रेक्षकांना खूप आडत आहे. मालिकेत एक स्त्री तिच्या पतीशिवाय तिच्या लहान मुलीला कशाप्रकारे वाढवते, हे दाखवले आहे. यात तिला मानसिक तसेच अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागते. तरी देखील ती एकटी तिच्या मुलीला जॉब करून खूप प्रेमाने वाढवते. अचानक त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती येते आणि त्यांचे आयुष्य बदलून टाकते. या लहान मुलीला आणि तिच्या आईला जगण्याचा एक आधार देते ही अत्यंत भावनिक आणि सुंदर कहाणी या मालिकेत दाखवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर

आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स

भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ऐकून नाचू लागतील चाहते

हे देखील वाचा