टेलिव्हिजनवरील झी मराठी या वाहिनीवर तब्बल पाच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मागील अनके दिवसांपासून या मालिकांचे प्रोमो टीव्हीवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मालिका काहीतरी नवीन आशय घेऊन येणार आहेत. तरीही प्रेक्षकांना हा मोठा प्रश्न पडलाय की, अचानक एवढ्या पाच मालिका कशा काय येणार आहेत. कदाचित गेल्या काही दिवसांपासून झी मराठीचा टीआरपी कमी झाल्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असावा. अशातच एका मालिकेचा प्रोमो सर्वांचे आकर्षण ठरत आहे. ती मालिका म्हणजे ‘तुझी माझी रेशीमगाठ.’
‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला होता. ज्यात एक लहान मुलगी अभिनेता श्रेयश तळपदे याच्यासोबत दिसत आहे. नुकताच या मालिकेचा दुसरा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये या मालिकेतील मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा समोर आला आहे. ती अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. श्रेयश तळपदे आणि प्रार्थना यांना तर सगळेच ओळखतात. पण या मालिकेत प्रमुख आकर्षण ठरत आहे, ती म्हणजे मालिकेतील चिमुकली. सर्वत्र तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच प्रार्थना बेहेरे आणि या मालिकेतील चिमुकली म्हणजेच मायरा वैकुळ हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
सध्या प्रार्थना बेहेरे आणि मायराचा सेटवरील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रार्थना आणि मायरा दोघीही त्यांच्या ड्रेससोबत हावभाव देताना दिसत आहेत. त्यांचा हा बुमरिंग व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला प्रार्थना बेहेरेच्या ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटातील ‘रंग हे नवे नवे’ हे गाणे लागले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या दोघीनींही निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहून ‘टू क्यूटीज इन वन फ्रेम’ असं म्हटलं, तर काही वावगं ठरणार नाही. त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (prarthana behere and myra vaikul’s video viral from tuzi mazi reshimgath set)
मायरा वैकुळ ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. एवढ्या कमी वयात तिचा अभिनय आणि हावभाव पाहून सगळेच तिच्या प्रेमात पडले आहेत. आता ‘तुझी माझी रेशीमगाठ’ या मालिकेत मायराला बघण्यासाठी सगळे प्रेक्षक तसेच तिचे चाहते उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘अब क्या कहे क्या नाम ले…’, म्हणत अंकिता लोखंडेने लावले जोरदार ठुमके; डान्स व्हिडिओ व्हायरल
-व्हिडिओ: टायगर श्रॉफने गायलेल्या पहिल्या हिंदी गाण्याचा दमदार टिझर प्रदर्शित
-‘शरारा शरारा’ गाण्यावर डान्स करत शमिता शेट्टीची ‘बिग बॉस ओटीटी’वर एन्ट्री