अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिच्या अभिनयाने मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजनवर देखील तिची खास ओळख निर्माण केली आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सहाय्यक अभिनेत्री म्हणून तिने तिच्या करिअरला सुरुवात केली. तेथून तिच्या पात्राला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आणि परत मागे वळून बघितले नाही. ती एका नंतर एक यशाच्या पायऱ्या तिच्या आयुष्यात चढत राहिली. प्रार्थना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतेच तिने तिच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्यासोबतच काही खास क्षण शेअर केले आहेत.
प्रार्थनाने (prarthana behere) तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पती अभिषेक जावकरसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघांमधील प्रेम स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्यापासून सुरू होते आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्या नावावर संपते; तू नेहमी माझ्यासाठी खास राहशील…. माझं तुझ्यावर प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझा हॅण्डसम नवरा.” (Prarthana behere give best wishes to her husband on his birthday)
प्रार्थनाने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. तिचे अनेक चाहते तिच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
प्रार्थना बेहरेने अभिषेक जावकरसोबत १४ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केले आहे. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वीच त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वतःची निर्मितीसंस्था सुरु केली. ‘डब्बा ऐस पैस’, ‘शुगर, सॉल्ट आणि प्रेम’ या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे. ‘मिसिंग ऑन अ वीकेंड’ या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.
हेही वाचा :