मराठी टेलिव्हिजनवर अनेक बालकलाकार आहेत. ज्यांनी त्यांच्या निरागस आणि गोड अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. पण यावर्षी एका अशा बालकलाकाराची ओळख झाली, जिने मालिकेच्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले आहे. मालिका सुरू झाल्यापासून तिचे सीन आले की, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच तिचा अभिनय पाहून तिच्या प्रेमात पडतात. ती चिमुकली अभिनेत्री म्हणजे मायरा वैकुळ होय.
मायरा सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत परीच्या भूमिकेत काम करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे हे कलाकार काम करत आहेत. मालिकेतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेत एक स्त्री तिच्या पतीशिवाय तिच्या लहान मुलीला कशाप्रकारे वाढवते, हे दाखवले आहे. यात तिला मानसिक तसेच अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागते. तरी देखील ती एकटी तिच्या मुलीला जॉब करून खूप प्रेमाने वाढवते. अचानक त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती येते आणि त्यांचे आयुष्य बदलून टाकते. या लहान मुलीला आणि तिच्या आईला जगण्याचा एक आधार देते. ही अत्यंत भावनिक आणि सुंदर कहाणी या मालिकेत दाखवली आहे. रविवारी (२६ सप्टेंबर) सर्वत्र जागतिक कन्यादिन साजरा होत आहे. या निमित्त मालिकेतील नेहाने तिची मुलगी परीला खूप सुंदर शुभेच्छा दिल्या आहेत. (prarthana behere give daughter’s day wishesh to myra vaikul)
प्रार्थनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा आणि मायराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधील सर्वात आकर्षित गोष्ट म्हणजे प्रार्थना आणि मायराने सारखाच टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे. त्यांच्या टी-शर्टवर मालिकेतील त्या दोघींचा प्रसिद्ध डायलॉग ‘अपने पास बहोत पैसा है’ लिहिलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्या दोघी देखील ‘अपने पास बहोत पैसा है’ म्हणत आहेत. व्हिडिओच्या शेवटी प्रार्थना सगळ्यांना कन्यादिनाच्या शुभेच्छा देते.
तिने शेअर केलेल्या या व्हिडिओवर त्यांचे अनेक चाहते, तसेच कलाकार प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर मंजिरी ओक हिने “किती गोड दोघी” अशी कमेंट केली आहे. तसेच ऋतुजा बागवे आणि सोनिया बलानी यांनी देखील कमेंट केली आहे. मायरा ही सध्या टेलिव्हिजनवरील लोकप्रिय बालकलाकार आहेत. सोशल मीडियावर देखील तिचे खूप चाहते आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, ‘यामुळे’ त्यांना सूट घालण्यावर शासनाने आणली होती बंदी
-अर्चना पूरन सिंग यांनी रात्री पळून जाऊन केलं होतं लग्न, बरंच चर्चेत राहिलंय त्यांचं वैयक्तिक आयुष्य