‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून सध्या प्रेक्षकांसमोर येणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या घरी नुकतेच नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. याबद्दल तिने स्वत:च व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. तिने तिच्या घरी एक छोटंस कुत्र्याचं पिल्लू आणलं आहे.
View this post on Instagram
प्रार्थनाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या कुत्र्याच्या पिल्लाचे नाव ‘मूव्ही’ असं ठेवल्याचंही सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या या गोंडस मूव्हीला कुरळवाळतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ अभिनेता भुषण प्रधानने शूट केले असल्याचेही प्रार्थनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. प्रार्थना आत्तापर्यंत मालिकांव्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्येही काम करताना दिसली आहे.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)










