Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

अशाप्रकारे झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या सेटवर प्रार्थना बेहरेचा वाढदिवस साजरा, फोटो आले समोर

मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि बिनधास्त अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिचा बुधवारी (५ जानेवारी) रोजी वाढदिवस झाला आहे. तिच्या वाढदिवसाला अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. कलाकारांनी देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रार्थना सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहे. या मालिकेच्या सेटवर तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन दणक्यात झाले आहे. मालिकेतील कलाकारांनी तिला सरप्राईज दिले आहे. याच सेलिब्रेशनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

तिच्या वाढदिवशी मालिकेतील कलाकारांनी केक कापून तिचा वाढदिवस साजरा केला आहे. सुरुवातीला ती जेव्हा मेकअप रूममध्ये जाते, तेव्हा इतरांनी ती रुम फुग्यांनी सजवली होती. तसेच बाकी डेकोरेशन केले होते. त्यांनी तिला सरप्राईज दिले. यानंतर मालिकेतील सगळे कलाकार एकत्र येतात आणि केक कापून तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी ती खूप खुश दिसत होती. (prarthana behere’s birtday celebration on majhi tujhi reshimgath set)

प्रार्थनाला (prarthana behere) मालिकेतील सहकाऱ्यांकडून एक खास गिफ्ट देखील मिळाले आहे. सगळ्यांनी तिला तिच्या फोटोंची फ्रेम दिली आहे. या फ्रेममध्ये तिचा तिच्या पतीसोबत एक फोटो आहे. तसेच मालिकेतील देखील फोटो तिच्या या फ्रेममध्ये दिसत आहे.

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिने सोशल मीडियावर देखील सगळयानाचे आभार मानले आहेत. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत प्रार्थना बेहरेसोबत अभिनेता श्रेयश तळपदे मुख्य भूमिकेत काम करत आहे. त्यांची मालिका चांगलीच गाजत आहेत. या मालिकेने प्रोमोपासूनच आख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहेत.

या मालिकेआधी प्रार्थनाने अनेक मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. तिने याआधी ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘व्हॉटसऍप लग्न’, ‘ती आणि ती’, ‘मस्का’, ‘फुगे’, ‘लग्न मुबारक’, ‘लव्ह यू जिंदगी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत देखील काम केले आहे.

हेही वाचा :

विकी कौशलने साली इसाबेल कैफला दिल्या अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा

अक्षय खन्नासोबत डेब्यू करणार होती बिपाशा, लग्नाआधी केले ‘या’ ३ अभिनेत्यांना डेट

Supriya@61: शाहिद कपूरची सावत्र आई असलेल्या सुप्रिया पाठक यांचा ‘हंसा पारेख’ होण्याचा थक्क करणारा प्रवास

हे देखील वाचा