यंदा कोरोना महामारीचे सावट दसरा सणावर नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक कलाकार मंडळी मोठ्या जल्लोषात विजयादशमी आणि दसरा साजरा करत आहेत. अशात अभिनेता प्रसाद ओक देखील उत्साहामध्ये दसरा साजरा करत आहे. त्याने त्याचे काही फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
अभिनेता प्रसाद ओकने यंदा त्याची पत्नी मंजिरी ओक बरोबर विजयादशमी साजरी केली आहे. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याच्या पत्नी बरोबर दिसत आहे. यावेळी प्रसादने निळ्या रंगाचा एक सुंदर कुर्ता परिधान केला आहे. तसेच त्याच्या कुर्त्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा रेखाटलेली दिसत आहे. निळा कुर्ता आणि पायात काळे बुट घालून तो अगदी ऐटीत उभा आहे. तसेच त्याची पत्नी मंजिरीने यावेळी गुलाबी रंगाची बारीक नक्षी असलेली नऊवारी साडी परिधान केली आहे. तसेच तिने यावर मराठमोळा साज शृंगार केलेला दिसत आहे. नाकात नथ आणि केसात माळलेल्या गजऱ्याने ती खूपच सुंदर दिसत आहे. यामध्ये दोघेही एकमेकांकडे पाहत आहेत. प्रसादने हे फोटो शेअर करत सर्व चाहत्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि हार्ट ईमोजीचा वर्षाव केला आहे.
तसेच मंजिरीने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोघांचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते दोघे तुळशी वृंदावनाला वंदन करत एकमेकांकडे बघताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर ही जोडी चांगलीच चर्चेत आली आहे.
प्रसादच्या सिनेसृष्टीतील कारकीर्दीविषयी बोलायचे झाल्यास, तो एक उत्तम अभिनेता असून कुशल दिग्दर्शक देखील आहे. त्याने आजवर ‘हिरकणी’, ‘कच्चा लिंबू’, ‘हाय काय नाय काय’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ‘खेळ मांडला’, ‘पकडा पकडी’, ‘लगे रहो मुन्ना भाय’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने दमदार अभिनय केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लईच भारी! झी मराठी पुरस्कार सोहळ्यात रोहित आणि कॅटरिनाची ‘ग्रॅंड एन्ट्री’
-अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्यावर चाहती फिदा; म्हणाली, ‘खूप गोड दिसतेस नजर…’