Saturday, June 29, 2024

‘प्रसाद ओक सर अचानक प्रयोगाला आले आणि…’ संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

आपल्या मराठी सिनेसृष्टीमधे चित्रपटांइतकेच महत्व नाटकांदेखील आहे. आज मराठीमधील आघाडीचे सर्वच कलाकारांचे पहिले प्रेम ‘नाटक’च आहे. त्यामुळे आज चित्रपटांमध्ये अभिनय करणारे, चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे बहुतकरून सर्वच कलाकार नाटकांची पार्श्वभूमी असणारे आहेत. सर्वच कलाकारांचे नाटकप्रेम या ना त्या कारणाने प्रेक्षकांसमोर येत असते. मराठीमधील अतिशय अष्टपैलू आणि हुशार अभिनेता म्हणून नावारूपास आलेला कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणने केवळ अभिनयच नाही, तर लिखाण, कविता, दिग्दर्शन आदी सर्वच क्षेत्रांमध्ये काम करत यश मिळवले आहे. नाट्य क्षेत्रात संकर्षणने उत्तम कामगिरी केली असून, सध्या त्याचे ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक तुफान गाजत आहे. याच नाटकाच्या पुण्यातील एका प्रयोगाला नुकतीच प्रसाद ओकने हजेरी लावली. त्याबद्दल संकर्षणने एक पोस्ट शेअर केली आहे.

संकर्षणने त्याच्या पोस्टमध्ये त्याचा आणि प्रसादचा एक फोटो शेअर करत लिहिले, “काल ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचे आमचे दिग्दर्शक प्रसाद ओक सर पुण्यात अचानक प्रयोगाला आले आणि मला म्हणाले किती झाले प्रयोग? मी आनंदाने म्हणालो २७५ होतील आता. मला वाटलं आता प्रसाद शाबासकी देईल आणि म्हणेल पार्टी करू. पण प्रसाद म्हणाला, ‘३०० पूर्ण झाले की, (पार्टी हाच शब्दं ऐकु येणार ह्याची खात्री मला पटली) २ दिवस परत रिहर्सल करु. म्हणजे मलाही कळेल की, तुम्ही मीच बसवलेलंच नाटक करता की नाही. असो, ब्रो भेटून गेला की मस्तं वाटतं.”

तत्पूर्वी प्रशांत दामले निर्मित या नाटकाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले असून, या नाटकामध्ये संकर्षणसोबतच अभिनेत्री भक्ती देसाई, अमोल कुलकर्णी, प्रिया करकमकर मुख्य भूमिकेत आहे. या नाटकात नवरा बायको यांच्यातील एक वेगळे नाते अतिशय हटके आणि विनोदी रूपाने प्रेक्षकांसमोर मांडले गेले असल्याने नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा