लोकप्रिय मराठी दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांचा ‘धर्मवीरः मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाने कमाईचे नवनवे रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. ठाणे जिल्ह्याचे शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जिवनावर आधारित हा चित्रपट होता. अभिनेता प्रसाद ओकने चित्रपटात आनंद दिघे यांची प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते. दिनांक (२६) ऑगस्ट रोजी आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिनेता प्रसाद ओकने मोठी घोषणा केली आहे.
View this post on Instagram
प्रसाद ओकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लवकरच धर्मवीर चित्रपटाच्या संपुर्ण प्रवासावर लिहलेले माझा आनंद पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून नेटकऱ्यांचा पुस्तकाला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – अभिनेत्री स्मिता पाटील यांचा लेक पुन्हा प्रेमात, पत्नीसोबत वेगळे झाल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट
स्वरा भास्करने सांगितलं तिच्या आयुष्यातील ‘तो’ किस्सा, शत्रूचाही केला खुलासा
विक्रम वेधाच्या धमाकेदार ट्रेलरला तुफान प्रतिसाद, ‘या’ बॉलिवूड कलाकारांनीही केले तोंडभरुन कौतुक