Thursday, November 21, 2024
Home मराठी प्रसाद ओकच्या ‘त्या’ व्हिडिओवर बायको मंजिरीची कमेंट ठरली लक्षवेधी

प्रसाद ओकच्या ‘त्या’ व्हिडिओवर बायको मंजिरीची कमेंट ठरली लक्षवेधी

मराठी मनोरंजनविश्वातील हरहुन्नरी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता असणारा प्रसाद ओक सतत काेणत्या ना काेणत्या कारणामुळे चर्चेत असतो. प्रसाद सध्याच्या घडीला इंडस्टीमधील सर्वात जास्त व्यस्त अभिनेता हे. एकीकडे अभिनय दुसरीकडे दिग्दर्शक अजून टेलिव्हिजन अशी तारेवरची कसरत तो करताना दिसतो. मात्र यामध्ये किती व्यस्त असला तरी तो सोशल मीडियावर तुफान सक्रिय आहे. त्याचे आणि त्याची पत्नी असलेल्या मंजिरी ओकचे मजेशीर रील व्हिडिओ तुफान गाजतात आणि व्हायरल देखील होत असतात.

नुकताच प्रसादने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचा एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ तर व्हायरल होतच आहे, सोबतच या व्हिडिओवर मंजिरीने केलेली कमेंट जास्त गाजत आहे. प्रसादने जो व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये हिंदी भाषेत एक आवाज येतो आणि म्हणतो, “आयुष्यात काय चालू आहे’?’ त्यावर प्रसाद ओक हा तोंड उघडून विचित्र इशारे आणि बोलण्याचे चाळे करत काहीतरी बोलत असल्याचे दाखवतो. मात्र त्याचा आवाजच येत नाही. ते पाहून समोरील माणूस म्हणतो, “भावा तू काय बोलतो, काही समजत नाही’. हे ऐकून प्रसादही जोरात चिडून म्हणतो, ‘तेच तर, मलाही काहीही समजत नाही’. हा व्हिडीओ शेअर करताना प्रसादने “कुछ समझ में नही आ रहा हैं” असे कॅप्शन दिले आहे.

या व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत, मात्र निर्माती आणि प्रसादाची बायको असलेल्या मंजिरी ओकने कमेंटमध्ये लिहिले, “प्रसाद घरी ये मी समजावते . क्या हैं ज़िंदगी ..ठीके?”. तिची ही कमेंट सध्या चांगलीच गाजत आहे.(prasad oak share reel video wife comment goes viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संगीतकार रिकी केज यांनी तिसऱ्यांदा पटकावला ग्रॅमी पुरस्कार, ट्विट करत सन्मान केला देशाला समर्पित
शाहरुखने कर्नल लूथराच्या पत्नीसोबतच केलं फ्लर्ट; थेट सोशल मीडियावरच म्हणाला, ‘टॉप सिक्रेट..’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा