Saturday, June 14, 2025
Home मराठी प्रसाद ओकच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धर्मवीर’मधील भूमिकेसाठी ‘हा’ मोठा पुरस्कार प्रदान

प्रसाद ओकच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘धर्मवीर’मधील भूमिकेसाठी ‘हा’ मोठा पुरस्कार प्रदान

मे २०२२ मध्ये प्रविण तरडे दिग्दर्शक असलेला ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला. अभिनेता प्रसाद ओक याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. आता त्याने निभावलेल्या या भूमिकेसाठी त्याला ‘दादा कोंडके स्मृती गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

धर्मवीर चित्रपटासाठी मिळालेला हा पहिला पुरस्कार त्याने धर्मवीर आनंद दिघे यांनाच समर्पित केला आहे. त्याने सोशल मीडियावर हा पुरस्कार मिळाल्यानंतरचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत आणि सर्वांचे आभार मानले आहेत.  त्याला दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते पुरुषोत्तम बेर्डे यांच्याकडून हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by @oakprasad

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा