Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘नाटक तुमच्या लायकीचं नाही’ म्हणत त्या कुटुंबाने प्रशांत दामले यांच्या चालू नाटकातून काढता घेतला होता पाय

प्रशांत दामले, हे नाव माहित नसलेला एकही मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही. जिथे जिथे नाटकांचे नाव येते तिथे तिथे प्रशांत दामले नाव निघते. नाटकं आणि प्रशांत दामले या एकाच नाण्याच्या दोन बाजू बनल्या आहेत. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य नाटकांसाठी वाहून घेतले आहे. या नाटकांनी देखील प्रशांत यांना प्रेक्षकांचे प्रेम, नाव, पैसा, ओळख, पुरस्कार आदी अनेक गोष्टी मिळवून दिल्या. केवळ रंगभूमीसाठी जगणारे अभिनेते असे म्हटले तरी त्यांच्या बाबतीत वावगे ठरणार नाही. आज ५ एप्रिल प्रशांत दामले त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे.

प्रशांत दामले यांनी नाटकांच्या बाबतीत अनेक नवनवीन विक्रम तयार केले. प्रशांत दामले यांचे नाटक म्हटल्यावर ते उत्तम असणार आणि गाजणार हे आधीच सर्वांना माहित असते. त्यांच्यावर कलाकारांसोबतच प्रेक्षकही तुफान प्रेम करतात. म्हणूनच प्रशांत यांनी प्रेक्षकांना चांगल्या वाईट गोष्टी, सल्ले देण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे. आपला घरातील सदस्य म्हणूनच प्रेक्षक देखील चांगले असले की त्यांचे कौतुक करतात आणि वाईट असले की स्पष्ट सांगतात देखील. असाच एक किस्सा प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता. एक कुटुंब त्यांचे नाटक अर्ध्यातच सोडून निघून गेले होते. याबद्दल त्यांनी पूर्ण घटना सांगितली.

प्रशांत दामले म्हणाले, “पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये माझ्या एका नाटकाचा प्रयोग सुरू होता. नाटक जेव्हा संपले तेव्हा तिकीट तपासणाऱ्या काही लोकांनी मला चार फाडलेली तिकीटं आणून दिली. ती तिकीटं स्टेपल केली होती. ती १६०० रुपयांची चार तिकीटं एका कुटुंबाची होती. त्यांना माझे नाटक अजिबातच आवडले नव्हते, म्हणूनच ते संपूर्ण कुटुंब नाटक अर्ध्यातच सोडून तिकीट जागेवर ठेऊन निघून गेले होते. त्या तिकिटांच्या मागे माझ्यासाठी एक संदेश देखील लिहिला होता. त्यांनी त्यात लिहिले होते की, “दामले हे नाटक तुमच्या लायकीचं नाही. आमची फसवणूक झाली आहे. आम्हाला आमच्या तिकिटाचे पैसे परत नकोत, आम्ही मध्यांतरातच नाटक सोडून जात आहोत.”

prashant damle

त्यानंतर या तिकीटांवरील त्या निरोपाने प्रशांत दामले यांना मोठा धडा दिला. दामले यांनी सांगितले की नाटक तसे देखील तितके खास नव्हते हे प्रशांत दामले यांनी या मुलाखतीमध्ये मान्यही देखील केले. निर्माता म्हणून त्यांचे त्या नाटकात पैसे अडकले असल्याने त्यांनी काही प्रयोग केले, पण पैसे वसूल झाल्यानंतर मिळाल्यावर त्यांनी ते नाटक बंद केले.

दरम्यान प्रशांत दामले यांनी नाट्यक्षेत्रात भरीव कामगिरी केली असून, नाटकांचा राजा म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. आतापर्यंत प्रशांत दामले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गर्व, लाइफस्टाइलमध्ये पैसा…’ चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून विवेक अग्निहोत्री यांनी साधला सुपरस्टार्सवर निशाणा

मोठी बातमी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन, वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

हे देखील वाचा