‘गाडी नंबर 1760’ निमित्तानं प्रथमेश परब (Prathamesh Parab)मटा कट्ट्यावर आला हाेता. तेव्हा त्याने ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांच्यासाेबत बाेलताना, इंडस्ट्रीत त्यांच्यावर झालेल्या गैरवर्तनावर थेट मत व्यक्त केलं.
2013 मध्ये ‘बालक-पालक’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण केकेला अभिनेता प्रथमेश परब, आज काेणत्याही ओळखीची गरज नाही. ‘टाईमपास’ मधील ‘दगडू’ या भूमिकेमुळे तो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. कॉमेडी असो किंवा सीरियस सीन प्रथमेश प्रत्येक भूमिकेला जीव तोडून न्याय देतो. आता तो त्याच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे ‘गाडी नंबर 1760’ नुकताच प्रदर्शित झाला आहे.
एका मुलाखतीत तो दिसला आणि तिथे त्याने ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याबद्दल बोलताना त्यांना ‘सॉरी’ म्हटलं. यावेळी तो थोडासा भावूकही झाला होता! ‘गाडी नंबर 1760’च्या प्रमोशनसाठी अभिनेता प्रथमेश परब नुकताच मटा कट्ट्यावर आला होता. या भेटीत त्याने ‘छावा’ सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावर मनापासून बोललं. त्यांना इंडस्ट्रीत ज्या चुकीच्या वागणुकीला सामोरं जावं लागलं, त्यावर प्रथमेशनं थेट भाष्य केलं. इतकंच नाही, तर त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी सहन केलेल्या अडचणी याबद्दलही तो बोलला. मराठी फिल्म इंडस्ट्रीत जे खूप कमी बोललं जातं, अशा काही गोष्टींवर त्याने थेट बोट ठेवलं. प्रथमेश उतेकर सरांबद्दल बोलताना थोडासा भावूक झाला आणि त्यांना मनापासून ‘सॉरी’ देखील म्हणाला.
‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता प्रथमेश परबने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या संघर्षाबद्दल मनापासून बोललं. तो म्हणाला, “जेव्हा उतेकर सर मराठी इंडस्ट्रीत आले, तेव्हा त्यांना योग्य संधीच मिळाली नाही. इतके मोठे दिग्दर्शक असूनही, कोणी साथ दिली नाही. त्यांना चित्रपटासाठी खूप धावपळ करावी लागली”. प्रथमेश पुढे म्हणाला,”मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि इंडस्ट्रीच्या वतीनं त्यांची माफी मागतो. मी त्यांना भडकताना पाहिलंय पण तरीही त्यांनी ‘छावा’ सारखा चित्रपट उभा केला!आणि जगाला दाखवून दिलं ‘मी आहे!’
त्यांचं आयुष्य, त्यांच्या गोष्टी खूप प्रेरणादायक आहेत. त्यांनी खूप स्ट्रगल केलाय आणि मराठीत दमदार चित्रपट करायचा प्रयत्न केला. पण मर्यादा आणि पैशांमुळे तो हिंदीत गेला”. “लक्ष्मण उतेकर सरांच्या संघर्षाबद्दल मला खूप वाईट वाटतं. कधी डब्बा हातात घेऊन फोटोग्राफरकडे असिस्टंट म्हणून काम करणारा माणूस आज मोठा दिग्दर्शक झालाय! पण दु:खाची गोष्ट ही आहे की,आम्ही मराठी लोकांनीच त्यांना ओळखलं नाही साथ दिली नाही. जे स्वतःला मराठीत ‘एक नंबर’, ‘दोन नंबर’ समजतात, त्यांनी त्याला कधीच उभं केलं नाही ही फारच खटकणारी गोष्ट आहे!”
प्रथमेश परबनं पुढे बोलताना साऊथ इंडस्ट्रीचं उदाहरण दिलं. तो म्हणाला, “साऊथमध्ये लोक त्यांच्या लेखक आणि दिग्दर्शकांना मान देतात, त्यांना साथ देतात म्हणूनच त्यांच्या फिल्म्स ओटीटीवरही तुफान चालतात!” “आपण मात्र असे टॅलेंटेड लोक गमावतो. ‘मुंज्या’ सारखा सिनेमा मराठीतही सहज होऊ शकला असता, पण बजेट नसल्यामुळे तो हातातून गेला हे खरंच दुखतं!”
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मधुर भांडारकरच्या ‘द वाइव्हज’ मध्ये मौनी रॉयची एन्ट्री; क्लॅप बोर्ड हातात घेत शेयर केला फोटो…