Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘…सारखा सारखा काय अभ्यास करायचा’, प्रार्थना अन् मायराचा मजेशीर व्हिडिओ भन्नाट व्हायरल; तुम्हीही पाहा

झी मराठी वाहिनीवर आता अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक जुन्या मालिका लवकरच बंद होणार आहेत. झी मराठीवर तब्बल पाच नवीन मालिका येणार आहेत. यातील एक मालिका प्रेक्षकांचे चांगलेच आकर्षण ठरत आहे. ती मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ होय. या मालिकेत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयश तळपदे दिसणार आहेत. यासोबतच या मालिकेतील लहान मुलगी सर्वांच्या पसंतीस पडत आहे. अशातच प्रार्थना बेहेरे आणि या मालिकेतील छोटी मुलगी म्हणजेच मायरा वैकुळ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मायरा आणि प्रार्थना काही डायलॉग म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडिओ ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या सेटवरील आहे. (prathana behere and mayra vaikul’s funny video viral on social media)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मायरा प्रार्थनाला म्हणते की, “आई मला कप केक पाहिजे म्हणजे पाहिजे.” यावर प्रार्थना म्हणते की, “कालच खाल्ला होता ना मग सारखा सारखा नाही खायचा.” यानंतर ती मायराला विचारते की, “तू अभ्यास केलास का?” यावर ती उत्तर देते की, “कालच केला होता ना, मग सारखा सारखा कशाला करायचा.”

त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया युझर्सला त्यांचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून मायराचे कौतुक करत आहेत.

मायरा ही आधीपासूनच सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात या मालिकेने तिला प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळणार आहे यात काही शंकाच नाही. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचे आतापर्यंत तीन प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. या प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ही मालिका २३ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ८. ३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! ‘बबड्या’ अन् ‘शुभ्रा’ची जोडी ‘या’ प्रोजेक्टमधून पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

-सरिता माधवनने लिहिले, ‘बायको नेहमीच बरोबर असते’, यावर माधवन म्हणतो, ‘नक्कीच मात्र ….

-देखा हजारो दफा आपको! ऋतुजा बागवेचा साडीतील साधेपणा पाहून चाहत्यांची बत्ती गुल

हे देखील वाचा