आपल्या सौंदर्याने सगळ्यांना भुरळ घालणारी, आणि एका नजरेतच तिच्या डोळ्यांनी सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित करणारी, मराठी चित्रपट सृष्टीमधील अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. ती नेहमी तिची पारंपरिक लूक मधील तसेच मॉडर्न लूक मधील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. प्रार्थनाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे, या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिचा हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच नवीन पद्धतीची सिल्वर ज्वेलरी घातली आहे. फोटोमध्ये प्रार्थना खूपच सुंदर दिसत आहे. त्या फोटोमध्ये तिच्या डोळ्यावर आलेली केसांची एक बट तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत आहे. तसेच त्या छोट्याशा टिकली तिचं सौंदर्य खुलले आहे.
हा फोटो पाहताच क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल. याआधी देखील तिने तिच्या अनेक फोटोंनी प्रेक्षकांना भुरळ घातली. तिने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. तसेच तिचे चाहते तिच्या या फोटोला प्रतिक्रिया देऊन तिचे कौतुक करत आहे.
प्रार्थना बेहरेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली. या मालिकेत तिने अंकिता लोखंडेच्या छोट्या बहिणीची पात्र निभावले होते. या पात्राने ती घराघरात पोहोचली.
त्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर तिच्या करिअरला असे काही वळण मिळाले की, केवळ ‘मितवा’ या एका चित्रपटाने तिला सर्वत्र प्रसिद्धी मिळाली. मितवा या चित्रपटासाठी प्रार्थना नाईन एक्स झकास हिरोइन या शोची विजेती स्पर्धक झाली होती. यानंतर तिने व्हाट्सअप लग्न, कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, ती आणि ती, मस्का, लव यू जिंदगी व फुगे या चित्रपटात काम केले. सध्या ती मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे.