Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड ‘बिग बॉस’ फेम प्रतीक सेहजपाल अडचणीत | प्रसिद्ध अभिनेत्रीने केले ‘हे’ गंभीर आरोप

‘बिग बॉस’ फेम प्रतीक सेहजपाल अडचणीत | प्रसिद्ध अभिनेत्रीने केले ‘हे’ गंभीर आरोप

‘बिग बॉस १५’ मधून लोकप्रिय झालेला प्रतिक सेहजपाल (Pratik Sehjpal) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. मात्र सध्या त्याच्या एका वादामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या त्याचा आणि ‘तु लौट आ’ गाण्याची अभिनेत्री कशिका कपूरने (Kashika Kapoor)  लावलेल्या आरोपामुळे अडचणीत सापडला आहे. या वादाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र कशिकाच्या या आरोपानंतर अनेक कलाकार प्रतिकच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत ज्यामध्ये करण कुंद्रा, विजी कुमार, निक्की तांबोळी यांनी या संबंधित सोशल मीडियावरुन प्रतिकची पाठराखण केली आहे. काय आहे हा सगळा वाद चला जाणून घेऊ. 

सध्या प्रतिक सेहजपाल आणि कशिका कपूरच्या ट्वीटयुद्धाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या वादाची सुरूवात प्रतीकच्या एका ट्वीटपासून सुरू झाली. ज्यामध्ये त्याने, “मी काय बोलू. मी एक मेहनती व्यक्ती आहे जो लोकांना वर पुढे घेऊन जाण्यावर विश्वास ठेवतो. मी मेहनत केली आहे तर मी एकटाच असेन जो मेहनतीला पात्र असेल, नाही का?” असे म्हणले होते. यानंतर कशिकानेही ट्वीट करत प्रतीकवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिने आपल्या ट्वीटमध्ये “म्हणूनच काल रात्री माझे सीन कमी केले आणि स्वतःचे वाढवले. स्टुडिओत जाऊन लोकांना म्हणायचं की, कशिकाला काही सांगू नका आणि ज्यामध्ये तिचे एक्सप्रेशन्स कमी दिसतील असेच व्हिडिओ टाका. या प्रकारामुळे रात्रभर झोपू शकले नाही.” असे गंभीर आरोप प्रतिकवर केले होते.

 

मात्र, नंतर तिने माघार घेत या आरोपांना केवळ प्रसिद्धीसाठी बोलले होते असे स्पष्टिकरण दिले. त्याचवेळी गाण्याच्या प्रमोशनसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रतीक सहजपाल अस्वस्थ दिसला आणि त्याने कशिकाला या विषयावर न बोलण्यास सांगितले. पण काशिका न थांबल्याने प्रतीकने पत्रकार परिषद सोडण्याची धमकी दिली. पण निर्मात्यांनी त्याला थांबवले.

या वादावर आता अनेक कलाकारांनी प्रतीकची पाठराखण केली आहे. ज्यामध्ये करण कुंद्राने “कोणत्या आधारावर त्याच्यावर हे आरोप करत आहात .कोणीही आरोप सिद्ध होईपर्यंत गुन्हेगार नसतो” असे म्हणले आहे. तर निक्की तांबोळीनेही प्रतिकचे समर्थन देताना “प्रतिक जसा दिसतो तसाच आहे. तो असे काही करणार नाही” असे म्हणले आहे. या प्रकरणाने सध्या सोशल मीडियावर चांंगलीच चर्चा रंगली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा