टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. तिच्या या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. केवळ वयाच्या २४ व्या वर्षी तिने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. तिच्या आत्महत्येनंतर तिचा बॉयफ्रेंड असलेल्या राहुल राज अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र आता इतक्या वर्षांनी राहुल राजने प्रत्यूषाच्या आत्महत्येवर भाष्य केले आहे.
प्रत्यूषाने १ एप्रिल २०१६ रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. या बातमीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. तिच्या मृत्यूनंतर बॉलिवूड, टीव्ही सर्वच लोकांना मोठा धक्का बसला होता. तिच्या आईवडिलांनी राहुल राजवर अनेक आरोप करत त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली होती. त्यानंतर काही काळ तो जेलमध्ये देखील गेला होता. आताच एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की त्याचा या केसशी काहीच संबंध नाही.
राहुलने सांगितले की प्रत्युषाच्या मृत्यू आधी ते दोघं पार्टी करत होते. यावर त्याला विचारले गेले की, मग असे काय झाले की तिने आत्महत्या केली. तो म्हणाला ती आत्महत्या करूच शकत नाही. राहुल राजने दावा करत सांगितले की, “मी मानूच शकत नाही की तिने आत्महत्या केली. त्यादिवशी तिने मला घाबरवण्यासाठी फाशी घेत असलेला व्हिडिओ पाठवला होता. ती असे नेहमीच करायची. असेच एकदा करत असताना तिचा तोल गेला आणि त्यामुळे हे घडले असावे.”
राहुल राजने हे देखील सांगितले की, प्रत्युषाच्या मृत्यूनंतर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यानंतर त्याला कोणीच काम दिले नाही. त्याने दावा केला की त्याला ‘लॉकअप 1’ ऑफर झाले होते मात्र विकास गुप्ताने त्याचा पत्ता कट केला. सोबतच त्याच्या हातातून इतरही अनेक शो गेल्याचे त्याने सांगितले.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन