प्रविण तरडे (Pravin Tarde) हे मराठी सिने जगतातील अभिनेते तर आहेतच त्याचबरोबर त्यांनी दिग्दर्शनातही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सरसेनापती हंबिरराव आणि धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हे दोन्हीही चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले होते. सरसेनापती हंबिरराव मधील त्यांच्या अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे प्रचंड कौतुक झाले होते. याच चित्रपटांसाठी प्रविण तरडेंना यंदाचा शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.
मुळशी पॅटर्न फेम दिग्दर्शक अशी ओळख असलेले प्रविण तरडे हे मराठी सिने जगताचे राजामौली म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार चित्रपटांसाठी आणि दिग्दर्शनामुळे त्यांनी मराठी सिनेजगताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. प्रविण तरडे यांचे अलिकडेच प्रदर्शित झालेले सरसेनापती हंबीरराव आणि धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हे चित्रपट प्रचंड गाजले होते. याच यशस्वी चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांना यंदाचा शाहीर दादा कोंडके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. याबाबतची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन प्रविण तरडे यांनी याबद्दलचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते पुरस्कार स्विकारताना दिसत आहेत. या फोटोसोबत प्रविण तरडे यांनी शाहीर दादा कोंडके पुरस्कार २०२२ – सर्वोत्त्कृष्ट दिग्दर्शक यंदाचा हा मानाचा पुरस्कार सरसेनापती हंबीरराव आणि धर्मवीर , मुक्काम पोष्ट ठाणे या दोन्ही सिनेमांच्या दिग्दर्शनासाठी मिळाला. या दोन्ही सिनेमांसाठी अहोरात्र झटलेल्या प्रत्येकाला हा पुरस्कार समर्पित, असा कॅप्शन दिला आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया देत अभिनंदन केले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, प्रविण तरडे यांचा सरसेनापती हंबीरराव चित्रपट सध्या सिनेमागृहामध्ये जोरदार कमाई करताना दिसत आहे तर त्यांचा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट नुकताच ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.सरसेनापती हंबिरराव चित्रपटात प्रविण तरडे यांनी दिग्दर्शनासह प्रमूख भूमिकाही साकारली होती.
‘सैराट’मधील आर्ची येणार नव्या कार्यक्रमातून भेटीला, प्रोमो ठरतोय चर्चेचा विषय
अभिनेत्री निक्की तांबोळीने ट्रोल करणाऱ्यांना सुणावले खडेबोल म्हणाली ‘मी रडले तरी…’