Friday, November 14, 2025
Home बॉलीवूड जरा इकडे पाहा! कारमधून उतरतानाही आलियाला होतोय त्रास, व्हायरल व्हिडिओत स्वत:ला सांभाळताना दिसली अभिनेत्री

जरा इकडे पाहा! कारमधून उतरतानाही आलियाला होतोय त्रास, व्हायरल व्हिडिओत स्वत:ला सांभाळताना दिसली अभिनेत्री

टीका आणि बॉयकॉट ट्रेंडचा सामना करूनही ‘ब्रह्मास्त्र‘ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. या सिनेमाच्या यशामुळे मुख्य भूमिकेतील कलाकार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर भलतेच खुश आहेत. हे जोडपे नुकतेच बाबा भोलेनाथच्या दर्शनासाठी सोमनाथला रवाना झाले. यादरम्यान रणबीर आणि गरोदर आलिया मुंबईच्या कलीना विमानतळावर स्पॉट झाले. यादरम्यान कारमधून उतरताना आलियाने असं काही केलं की, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत आलिया भट्ट (Alia Bhatt) जशी कारमधून उतरते, तेव्हा लगेच ती तिचे पोट पकडताना दिसते. यावरून दिसते की, आलियाला गरोदरपणामुळे उठताना-बसताना अडचण येत आहे. नुकतेच आलिया विमानतळावर कारमधून खाली उतरत होती, तेव्हा तिने तिचे पोट पकडले होते. यानंतर तिने सावकाश तिचा पाय खाली ठेवला आणि ती पुढे निघून गेली.

गुलाबी रंगाच्या सूटमध्ये दिसली आलिया
गरोदरपणामुळे आलिया आता सैल कपड्यांमध्ये पॅपराजींच्या कॅमेऱ्यात कैद होत आहे. यादरम्यान आलिया कलीना विमानतळावर गुलाबी रंगाच्या सैल पायजम्यात आणि लाँग कुर्त्यामध्ये दिसली. आलियाने यावेळी न्यूड मेकअप केला होता. तसेच, तिने तिचे केस मोकळे सोडले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रणबीरसोबत दिले पोझ
आलिया कारमधून उतरल्यानंतर जशी पुढे आली, तेव्हा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यानेही एन्ट्री केली. या दोघांनी एकत्र पॅपराजींसमोर पोझ दिले. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचे यश पाहता आलिया आणि रणबीर सध्या मंदिरांमध्ये हजेरी लावत आशीर्वाद घेताना दिसत आहेत. अशात हे जोडपे नुकतेच सोमनाथ मंदिरात पोहोचले. यादरम्यानचे फोटो ‘ब्रह्मास्त्र’चे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी शेअर केले आहेत. यामध्ये अयान रणबीरसोबत पोझ देताना दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमातील कास्टबद्दल बोलायचं झालं, तर त्यात आलिया आणि रणबीरव्यतिरिक्त नागार्जुन, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सैराट’ फेम प्रिन्स बाबा आला गोत्यात, अभिनेता सुरज पवारला ‘या’ गंभीर गुन्ह्यात होणार अटक?
विकीच्या वडिलांनी उंचावली खानदानाची मान! नॉर्वेत ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने झाला सन्मान
बॉयकॉट करुनही सुपरहीट, दिग्दर्शक अयान मुखर्जींनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘बॉयकॉटची चिंता आम्हाला…’

हे देखील वाचा