Saturday, June 29, 2024

लवकरच आई होणाऱ्या एवलिन शर्माने डिलिव्हरी आधीच केला बाळाच्या जेंडरचा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्मा सर्वांना आठवतच असेल. यारिया, मैं तेरा हिरो, ये जवानी है दिवानी आदी अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले. एवलिन लवकरच आई होणार आहे. काही महिन्यांपूर्वी तिनेच याबद्दल माहिती दिली होती. मात्र आता एवलिनने तिला मुलगा होणार की मुलगी याबद्दल खुलासा केला आहे.

एक मोठ्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये एवलिनने तिला मुलगा होणार की, मुलगी याबद्दल सांगितले. एवलिन लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. एवलिन एक मुलीची आई होणार आहे. याविषयी सांगताना एवलिन म्हणाली, “मी एक मुलीला जन्म देणार आहे. मला हे समजल्यापासूनच मी अतिशय उत्साहित झाली आहे. मुलगी होणार या बातमीने माझा आनंद द्विगुणित झाला आहे.”

एवलिनने याचवर्षी मे महिन्यात ऑस्ट्रेलियातील सर्जन डॉक्टर असणाऱ्या तुषाण भिंडीसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो तिने जूनमध्ये तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर देखील केले होते. त्यांनी अतिशय खासगी स्वरूपात कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केले होते. एवलिन आणि तुषाण हे एक ब्लाइंड डेट सेटअपवर पहिल्यांदा भेटले होते. दोघांची पहिली भेट त्यांची कॉमन फ्रेंड असणाऱ्या एली अवरामच्या माध्यमातून झाली. तुषाणला पहाचक्षणी एवलिन त्याच्या प्रेमात पडली.

एवलिनने जुलै २०२१मध्ये ती प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले. तिने इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाच एक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली होती. सध्या एवलिन तिची ही प्रेग्नन्सी फेज खूपच एन्जॉय करत आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो शेअर करत आहे. २०१२ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या एवलिनने भरपूर फॅन फॉलोविंग तयार केली आहे. अनेक चित्रपटांमध्ये दिसणारी एवलिन शेवटची २०१८ साली आलेल्या प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या साहो सिनेमात झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा

-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे

-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका

हे देखील वाचा