Monday, July 1, 2024

मोठी बातमी! बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल

भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फास अधिकच घट्ट होत असताना बॉलिवूडमध्ये कोरोनाने चांगलेच थैमान घातलेले दिसत आहे. करीना कपूरपासून अर्जुन कपूरपर्यंत अनेक लहान मोठे कलाकार कोरोनाने संक्रमित होताना दिसत आहे. टेलिव्हिजन विश्व देखील या कोरोनाला अपवाद ठरले नसून, या इंडस्ट्रीमधील देखील अनेक कलाकार कोरोनाच्या कचाट्यात अडकले आहेत. यासर्व कलाकारांमध्ये बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते आणि लोकप्रिय खलनायक प्रेम चोप्रा यांच्या नावाची देखील भर पडली आहे.

हो बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा हे दोघेही कोरोनाने संक्रमित झाले आहेत. बॉलिवूडमध्ये आलेल्या या कोरोनाच्या संकटामध्ये प्रेम चोप्रा देखील अडकले असून ८६ वर्षीय प्रेम चोप्रा कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहेत. या दोघांच्या कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या बातमीने सर्वानाच मोठा धक्का बसला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखी खाली प्रेम चोप्रा आणि उमा चोप्रा यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्या दोघांची प्रकृती स्थिर असून, त्यांना काही दिवसातच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. प्रेम चोप्रा आणि उमा चोप्रा या दोघांना मोनोक्लोनल एंटीबॉडी कॉकटेल देण्यात आले असून, ८० वर्षांपेक्षा अधिक वय असूनही सुदैवाने त्यांची रिकव्हरी उत्तम पद्धतीने होत आहे.

दिग्ग्ज अभिनेते प्रेम चोप्रा यांनी खलनायक साकारत असंख्य चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी त्यांच्या भूमिकांमधून अभिनयाचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांसमोर आणले. प्रेम चोप्रा आणि उमा चोप्रा यांच्या लग्नाला ६० पेक्षा अधिक वर्ष झाले असून त्यांना रकिता, पुनिता आणि प्रेरणा या तीन मुली आहेत. उमा चोप्रा या राज कपूर यांच्या बहीण आहेत.

हेही वाचा :

डिपनेक लाँग गाऊनमध्ये खुलले माधवी निमकरचे सौंदर्य, नवीन फोटो आले चर्चेत

दहा वर्षांपूर्वी ‘अशी’ दिसायची सुपरबोल्ड निया शर्मा, फोटोमध्ये ओळखनेही आहे कठीण!

आनंद शिंदे यांनी मीरा आणि जय यांना दिली गाण्याची ऑफर, आगामी काळात झळकणार एकत्र

 

हे देखील वाचा