Monday, July 8, 2024

‘टायगर ३’ च्या खास सीनच्या शूटिंगला सुरुवात, सलमान, कॅटरिनासोबत इम्रान हाश्मी देखील होणार सामील

यशराज फिल्म्सच्या स्टुडिओमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ‘टायगर ३’च्या शूटिंगला सुरुवात केली होती. परंतु सलमान खान आणि कॅटरिना कैफ दिल्ली एनसीआरमध्ये चित्रपटाच्या काही महत्वपूर्ण दृश्यांची शूटिंग सोमवारी (१४ फेब्रुवारी) रोजी होणार आहे. या शूटिंगसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण होणार आहे. नोएडाच्या एका प्राएव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये या शूटिंगची तयारी चालू आहे चित्रपटाचे सगळे कलाकार आणि टेक्निशियन दिल्लीला पोहचले आहेत. रविवारी (१३ फेब्रुवारी) रोजी अभिनेता इम्रान हाश्मीला देखील मुंबई एरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की, इम्रान हाश्मी देखील या चित्रपटाच्या शूटिंगला दिल्लीला चालला आहे.

सलमान खानने (salman khan) ‘टायगर ३’ ची शूटिंग फेब्रुवारी महिना सुरू होताच सुरू केली होती. तसेच ही बातमी आली की, चित्रपटाची शूटिंग दिल्लीमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी स्केडुल करण्यात आली आहे. यामध्ये सगळे कलाकार सहभागी असणार आहेत. यावेळी काही महत्वाचे सीन दिल्ली राजधानी क्षेत्रात वेगवेगळ्या जागेत शूट केले जाणार आहेत. या शूटिंगमध्ये सामील होणारे सगळे कलाकार, टेक्निशियन यांची पुन्हा एका कोरोना टेस्ट केली जाणार आहे. ज्यांची कोरोना टेस्ट करणे शक्य नाही त्यांची अँटीजन टेस्ट करण्याची सुविधा तिथे केली जाणार आहे. (prepration complete for the shooting of tiger 3, in nodia salman, Katrina along with Emraan Hashmi will also be involved)

दिल्लीमध्ये उरलेली ही खास शूटिंग जवळपास २ आठवडे चालू शकते. त्यानंतर ‘टायगर ३’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण होणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे, याची माहिती अजून समोर आली नाही. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी घाई करणार नाहीत. बिग बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट हिंदी आणि इंग्लिशसोबत बाकी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे सलमान आणि कॅटरिनाचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. याआधी देखील त्या दोघांना अनेकवेळा चाहत्यांनी एकत्र पाहिले आहे. त्यांची जोडी सगळ्यांना खूप आवडते. आता पुन्हा एकदा त्यांना एकत्र चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा