Saturday, January 17, 2026
Home मराठी गौतमी पाटीलची पहिलीचं गवळणं प्रदर्शित, “कृष्ण मुरारी” गाणं सोशल मीडियावर व्हायरल! गौतमी पाटीलच्या बहारदार नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” गाणं प्रदर्शित!

गौतमी पाटीलची पहिलीचं गवळणं प्रदर्शित, “कृष्ण मुरारी” गाणं सोशल मीडियावर व्हायरल! गौतमी पाटीलच्या बहारदार नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” गाणं प्रदर्शित!

आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत, गौतमी पाटीलच्या नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच तिने या गाण्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या गाण्यात ती गोपिकेच्या भूमिकेत दिसत असून श्री कृष्णाची आराधना करताना दिसत आहे.

“कृष्ण मुरारी” या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलार हिने हे गाणं गायलं असून विशाल शेलार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचे संगीत आयोजन आदित्य पाटेकर व करण वावरे यांनी केले आहे. कृष्ण मुरारी या गाण्याचे चित्रीकरण पुण्यात करण्यात आले आहे. परंतु हे गाणं पाहताना वृंदावनात असल्याचा भास होतो.

गौतमी तिच्या पहिल्या गवळण गीताविषयी व गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “लोकसंगीतातील गवळण हा नृत्यप्रकार मला फार आवडतो. माझी खूप दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्यामुळे माझी इच्छापूर्ती झाली. त्यामुळे मी साईरत्न एंटरटेन्मेंट आणि निर्माते संदेश गाडेकर व सुरेश गाडेकर यांचे मनापासून आभार मानते. माझी कृष्णावर नितांत श्रद्धा आहे. मी दररोज कृष्णाची भक्तीभावाने आराधना करते. हे गाणं चित्रीत करताना मला खूप मज्जा आली. मला खूप सुंदर कमेंट्स येत आहेत हे पाहून अस वाटतंय प्रेक्षकांना हे गाणं आवडत आहे. माझ्यावर प्रेक्षकांचे असेच प्रेम कायम राहो हीच सदिच्छा!.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

झिन्दगी ना मिलेगी दोबाराचा दुसरा भाग नक्कीच बनायला हवा; ह्रितिक रोशनने व्यक्त केली इच्छा …

हे देखील वाचा