Saturday, June 29, 2024

‘दोन कोटी रुपये की, ६ मुलींसोबत हॉलिडे?’, प्रियांकाच्या प्रश्नावर कपिलने दिले जबरदस्त प्रत्युत्तर, ऐकून तुम्हीही खदखदून हसाल

कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ द्वारे प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. हा शो काही काळासाठी बंद करण्यात आला आहे, परंतु लवकरच तो त्याच्या आधीच्या टीमसह पुनरागमन करणार असल्याचे वृत्त आहे. सध्या तरी या शोला सुरू होण्यासाठी बराच वेळ आहे, परंतु या शोसंबंधित बरेच किस्से नेहमीच चर्चेत येत असतात. आपण त्या मजेदार किस्स्याबद्दल जाणून घेऊया, जेव्हा प्रियांका चोप्रा तिच्या ‘स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये आली होती. त्यावेळी सेटवर खूप मजा-मस्ती झाली होती.

लग्नानंतर प्रियांका प्रथम कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचली होती. या दरम्यान कपिलने प्रियांकासोबत खूप मजा-मस्ती केली. त्याचवेळी प्रियांकाही कपिलसोबत मोकळेपणाने बोलताना दिसली. यावेळी तिने कपिलला एक प्रश्न विचारला होता. प्रश्नाचे उत्तर ऐकून जज अर्चनापासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वत्र हास्याचा कल्लोळ उडाला.

वास्तविक, प्रियांकाने कपिलला विचारले होते, “जर तुला एका बाजूला 2 कोटी रुपये मिळाले आणि दुसर्‍या बाजूला 6 सुंदर मुलींसोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेण्याची संधी मिळाली, तर तू काय निवडशील?” त्याला उत्तर देत कपिल म्हणाला, “मी 2 कोटी घेईन, कारण सेम पॅकेज तर मी 60 हजार रुपयात बुक करेल.” कपिलचे हे उत्तर ऐकून प्रियांका, अर्चना आणि प्रेक्षक जोरजोरात हसू लागले.

याशिवाय प्रियांकाने कपिलला विचारले की, “एका बाजूने गिन्नीने बोलावले आणि दुसरीकडून आईने, तर कोणाकडे जाशील? यावर कपिलची आई म्हणते की, “तो आधी त्याच्या बायकोकडे जाईल.” कपिलच्या आईचे उत्तर ऐकताच प्रत्येकजण हसू लागला. त्यानंतर कपिल म्हणाला की, “सगळे म्हणतात की लग्नानंतर मुलगा बदलतो, इथे तर माझी आई बदलली आहे.”

शोमध्ये कपिल आणि प्रियांकाने एकमेकांच्या अनेक मजेदार प्रश्नांची उत्तरे दिली, जी प्रेक्षकांना खूप आवडली. यावर्षी कपिल शर्मा पुन्हा वडील झाला आहे, तर कुटूंबासमवेत वेळ घालवण्यासाठी कपिलला थोडा वेळ हवा होता, म्हणून हा शोही काही काळ थांबवला गेला आहे. त्याचवेळी चाहते कपिल आणि टीम परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओ तेरी!’ अनुष्कानेे पती विराटला एकदा नव्हे, तर दोनदा उचलून दाखवली आपली ताकद, चाहत्यांनी म्हटले ‘शक्तिमान’

-‘बिग बॉस १४’ फेम निक्की तांबोळीच्या बाथरूममधील व्हिडिओने वेधले चाहत्यांचे लक्ष, ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा

-मल्टीकलर स्विमसूटमध्ये बोल्ड अंदाजात दिसली प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट; पाठीवरील टॅटूने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

हे देखील वाचा