Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

अजबच! श्रीदेवीची को- स्टार प्रिया आनंदचा कारमध्ये किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मिळाले १ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रिया आनंदने नुकतीच चर्चेचा विषय ठरत आहे. प्रिया सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तिने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, जो भलताच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती लहान मुलाला वेड्यासारखी किस करताना दिसत आहे.

प्रियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तिच्यासोबत या व्हिडिओत लहान बाळ सुद्धा दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की,”माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आणि तुझ्या आईवर खूप प्रेम करते.”

व्हिडिओ दोन आठवड्यांपूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. जो आत्ताही खूप जोरदार व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत व्हिडिओला जवळपास 1 लाख 30 हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यासोबतच या व्हिडिओवर भरपूर कमेंट येताना दिसत आहेत.

तिचे इंस्टाग्रामवर जवळपास दहा लाख फॉलोवर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टला खूप लाईक मिळत असतात. काही दिवसांपूर्वीच तिचा नोटांची माळ घालून फोटो खूप व्हायरल झाला होता. ज्याच्यावर एका युजरने कमेंट करत सल्ला दिला होता की, “ज्याच्याजवळ पैसा असतो ते कधी दिखावा नाही करत आणि ज्यांच्याकडे नसतो ते कायम सगळ्यांना दाखवतात की, ते खूप श्रीमंत आहेत .”

प्रिया आनंद लवकरच तमिळ चित्रपट ‘सुमो’मध्ये दिसणार आहे. यामध्ये ती परत एकदा तिचा हॅलो चेन्नई हिरो मिर्ची शिवासोबत काम करणार आहे. ती आयुष्मान खुरानाचा सिनेमा अंधाधूनच्या तमिळ रिमेक ‘अंधागन’ मध्ये सुद्धा काम करत आहे. ज्यामध्ये अभिनेता प्रशांतसोबत प्रिया मुख्य भूमिकेत असणार आहे. प्रिया यामध्ये राधिकाची भूमिका निभावणार आहे.

याव्यतिरिक्त तिने इंग्लिश-विंग्लिश या चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसोबत काम केले होते. त्यानंतर ती लाईमलाईटमध्ये आली होती. तिने ‘फुकरे’ या चित्रपटामध्ये सुद्धा दमदार अभिनय केला होता. तिने तमिळ, तेलुगु आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलेले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरुणाचल प्रदेशातील आगीत नुकसान झालेल्या लोकांसाठी धावून आले वरुण- नताशा, केली ‘इतक्या’ लाख रुपयांची मदत

-अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणींना राणीचा ‘गुरुमंत्र’, म्हणाली ‘…तर तुम्ही खुशाल या’

-‘इंडियन आयडल १२’ चा भाग बनल्यामुळे गायिकेने साधला ‘सदाबहार’ अभिनेत्री रेखावर निशाना, तर अनु मलिकला म्हटले क्रूर

हे देखील वाचा