Tuesday, July 9, 2024

प्रिया बापटने शेअर केला उमेश कामतसोबतचा गोड फोटो, पारंपारिक वेशात गजब दिसतेय जोडी!

मराठी चित्रपटसृष्टीतील सध्या टॉपला असणारी अभिनेत्री प्रिया बापट. प्रिया सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. दररोज तिच्या चाहत्यांसाठी ती न चुकता फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोंना खूप चांगला प्रतिसाद देत असतात. अशातच प्रियाने तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत याच्यासोबत काही खास फोटो शेअर केले आहेत.

प्रियाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून उमेश कामतसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियाने केशरी रंगाची साडी नेसलेली आहे. यावर तिने सोनेरी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. मिडल पार्टेशन करून केस मागे बांधलेले आहेत. तसेच गळ्यात केवळ एक मोत्याची माळ घातली आहे. तसेच उमेशने देखील कुर्ता घातलेला आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. (Priya bapat share a photo with umesh kamat on social media)

तिच्या चाहत्यांना त्यांचा हा फोटो खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर सातत्याने कमेंट करून त्यांच्या जोडीचे कौतुक करत आहेत.

नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे, आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापटने, अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाइमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लिज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून, लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. याशिवाय प्रिया संजय दत्त अभिनित ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे. तसेच उमेशने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. तो सध्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत मुक्ता बर्वेसोबत काम करत आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षयच्या आईच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी लिहिलं भलं मोठ्ठं पत्र; वाचून अभिनेताही झाला भावुक

-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट

-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक

हे देखील वाचा