अभिनेत्री प्रिया बापटने चित्रपटसृष्टीत अगदी कमी कालावधीत स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. आज तिचे लाखो चाहते आहेत. छोट्या भूमिका करण्यापासून ते मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारण्यापर्यंत, प्रियाने खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळेच आज तिला प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आहे. ही सुंदर अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहून बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिचा एक हटके लूकमधील फोटो व्हायरल होत आहे.
नुकतेच प्रियाने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. यावर लाल रंगाचे मोठे स्पॉट आहेत. तसेच तिने डोळ्यांवर गॉगल घातलेला आहे. कानात पिवळ्या रंगाचे इअरिंग घातले आहेत. यासोबत तिने केसांची पोनीटेल घातली आहे. ती या लूकमध्ये डॅशिंग पोझ देताना दिसत आहे. (Priya bapat share her dashing photo on social media)
प्रियाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकजण या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. सोनू लखवानी यांनी “दबंग,” अशी कमेंट केली आहे. तिच्या चाहत्याने कमेंट केली आहे की, “काला चष्मा जजता है, जजता है गोरे मुखडे पे.” एकाने तिला “लेडी रणवीर सिंग,” असे म्हटले आहे. तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
अभिनेत्री प्रिया बापटने नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाईमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लीज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
याशिवाय प्रिया संजय दत्तसोबत ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे. तसेच तिने ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरिजमध्येही काम केले आहे. या वेबसीरिजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच तिची आणि तिचा पती उमेश कामत यांची ‘आणि काय हवं’ ही वेबसीरिज देखील प्रदर्शित झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण
-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’
-जेव्हा शाहरुख खानला महिला चाहती म्हणाली होती, ‘आय लव्ह यू अक्षय’; रंजक आहे ‘तो’ किस्सा