Saturday, April 19, 2025
Home मराठी ‘दोन शरीर, पण एक हृदय!’, म्हणत प्रियाने शेअर केली पती उमेशसोबतची रोमँटिक झलक

‘दोन शरीर, पण एक हृदय!’, म्हणत प्रियाने शेअर केली पती उमेशसोबतची रोमँटिक झलक

प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं आहे. हे दोघे एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना कधीही मागेपुढे पाहत नाही. सोशल मीडियावर देखील ते सतत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून एकमेकांवरचं आपलं प्रेम व्यक्त करताना दिसत असतात. १० वर्ष संसार करत असलेल्या या जोडप्याने चाहत्यांच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे.

त्यांचे फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्याला चाहते आणि कलाकार मंडळी भरभरून प्रेम देतात. अशातच प्रिया आणि उमेशचा एक रोमँटिक फोटो समोर आला आहे, ज्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे. हा फोटो प्रिया बापटने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. (priya bapat shared romantic photo with husband umesh kamat see here)

प्रियाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत. उमेशचा एक हात प्रियाच्या हातात, तर दुसरा हात तिच्या खांद्यावर आहे. यातील दोघांची स्माईल पाहून, तुम्हीही त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत. हा गोड फोटो शेअर करत प्रियाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “दोन डोकी मात्र एक हृदय!”

प्रिया आणि उमेशची ऑफस्क्रीन जोडी जितकी पसंती केली जाते, तितकंच ऑनस्क्रीनही त्यांना प्रेम मिळतं. या जोडीने अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये एकत्र काम केलं आहे. यामध्ये ‘आणि काय हवं’, ‘टाइम प्लिज’, ‘शुभंमकरोती’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’ यांचा समावेश आहे. तर अलीकडेच त्यांच्या ‘आणि काय हवं’ वेब सिरीजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, ज्याला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश

-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर

-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट

हे देखील वाचा