मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि ओटीटी विश्वातील ओळखीचा चेहरा म्हणजे प्रिया बापट. प्रियाने तिच्या अभिनयाने सर्वांनाच आपलेसे केले. आज ती मराठी इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री आहे. प्रियाने मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा सर्वच माध्यमांमधून तिने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. आता तर प्रिया निर्मिती क्षेत्रात देखील उतरली आहे. प्रभावी अभिनय आणि चुलबूलपणा यामुळे तिने तिची छाप प्रेक्षकांवर पाडली. सोशल मीडियावरही ती कमालीची सक्रिय आहे. सतत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती फॅन्सच्या संपर्कात राहत असते. नुकताच प्रियाच्या बाबांचा वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने तिने वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली असून, यात तिने लग्नानंतर आडनाव का बदलले नाही याबद्दल देखील खुलासा केला आहे.
प्रियाने तिचा बाबांसोबतचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “प्रिय बाबा, आज तुमचा ८१ वा वाढदिवस. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा.
View this post on Instagram
मी कितीही आईवेडी असले तरीही माझ्या वडिलांशी माझं असलेलं नातं जास्त युनिक आहे.
प्रत्येक मोठा निर्णय घेताना आम्हा दोन चिमुरड्या मुलींना समोर बसवून त्यांचं मत विचारात घेणारे “माझे बाबा”. अवाजवी हट्ट नाही, पण आपल्या मुलींचे शक्य ते सर्व लाड करणारे माझे बाबा. माझा हात धरून पहिल्यांदा मला शूटिंग च्या सेट वर घेऊन जाणारे आणि B. A Economics केल्यावर बँकेची परीक्षा दे म्हणून आग्रह धरणारे. आणि तरीही मी चित्रपट क्षेत्राची निवड केल्यावर ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे बाबा. खरंतर खूप कमी व्यक्त होणारे, पण आईच्या तक्रारी घेऊन जेव्हा ते माझ्याकडे यायचे, तेव्हा मला पालकाच्या भूमिकेत बघायचे. विश्वास, जबाबदारी आणि प्रेम या तीनही भावनांशी ओळख करून देणारे आणि त्यांना कायम घट्ट धरून ठेवणारे माझे बाबा.
मला खूप जणं विचारतात लग्नानंतर मी माझं आडनाव का नाही बदललं. कारण, I am proud to be ‘Sharad Bapat’s daughter. बाबा, तुम्ही मला “प्रिया” म्हटलत आणि “प्रिया शरद बापट” ही ओळख दिलीत जी मी आयुष्यभर जपेन.”
प्रियाच्या या पोस्टवर अमृता खानविलकर, आदर्श शिंदे, हर्षदा खानविलकर आदी अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या असून, नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत तिच्या बाबांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-