वाईट! आपल्या डोळा मारण्याने जगाला वेड लावणारी प्रिया वारियर शुटिंग दरम्यान झाली जखमी, पाहा व्हिडीओ


विंक गर्ल ‘प्रिया प्रकाश वारियर’ आज करोडो प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन बनली आहे. रातोरात आपल्या काही सेकंदाच्या डोळा मारण्याच्या व्हिडिओने ती प्रसिद्ध झाली होती. तिच्या त्या व्हिडिओने सोशल मीडियावर खूपच राडा घातला होता. अगदी कमी वेळात हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता. प्रिया सोशल मीडियावर देखील खूपच सक्रिय असते. तिचे अनेक नवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

या दिवसात प्रिया आपला आगामी चित्रपट ‘क्रैक’ ला घेऊन खूपच चर्चेत आहे. या चित्रपटांतून ती तेलगू चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे. प्रिया सध्या क्रैक या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूपच बिझी आहे आणि याच शुटिंग दरम्यान तिच्यासोबत एक प्रसंग घडला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने व्हायरल झाला आहे.

प्रिया प्रकाश वारियरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रिया क्रैक चित्रपटातील गाणे शूट करत आहे. या व्हिडिओमध्ये ती पळत येते आणि नितीनच्या पाठीवर उडी मारते आणि तेव्हाच तिच्या सोबत हा अपघात घडतो. या दरम्यान प्रियाचा तोल जातो आणि ती जमिनीवर पडते.

प्रिया जमिनीवर खूप जोरात पडते, यावेळी तिच्या डोक्याला जखम झाली आहे. परंतु जेव्हा ती पडते तेव्हा सेटवरील सगळी माणसे तिला उठवण्यासाठी गोळा होतात. तेव्हा नितीन तिचा हात पकडुन तिला उठवतो आणि तिच्या तब्येतीची विचारपूस करतो.

हा व्हिडीओ प्रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला शेअर करत तिने असे लिहले आहे की, ” माझे आयुष्य मला कसे खाली पाडतं याची ही एक झलक आहे. परंतु मी प्रत्येक वेळेस जोमाने उभी राहते, आणि आयुष्यात पुढे जाते.” अश्याप्रकरे प्रियाने आपल्या आयुष्याशी या व्हिडीओला जोडले आहे. तिच्या या व्हिडिओला इंस्टाग्रामवर भरभरून प्रतिक्रिया येत आहे. तसेच तिच्या तब्बेतीबद्दल देखील विचारपूस होत आहे.

 


Leave A Reply

Your email address will not be published.