Friday, October 17, 2025
Home साऊथ सिनेमा अवघ्या देशाला नजरेने वेड लावणारी प्रिया प्रकाश वाॅरियर, आता नव्या लूकनेही पाडतेय सर्वांना भुरळ! पाहा खास फोटो

अवघ्या देशाला नजरेने वेड लावणारी प्रिया प्रकाश वाॅरियर, आता नव्या लूकनेही पाडतेय सर्वांना भुरळ! पाहा खास फोटो

प्रिया प्रकाश वारियरच्या फॅशन स्टाईलची आजकाल बरीच चर्चा चालू आहे. आपल्या डोळ्याच्या ईशाऱ्याने संपूर्ण देशाच्या काळजावर वार करणारी, प्रिया प्रकाश तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी विशेष ओळखली जाते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रिया प्रकाश पूर्णपणे नवीन आणि स्टाईलिश लूकमध्ये दिसली आहे. प्रिया प्रकाशच्या समोर आलेल्या या फोटोंवर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.

फोटोत आपण पाहू शकतो की, प्रिया प्रकाशने काळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. यासोबत तिने तिचे केस कुरळे केले आहेत. तिने घातलेल्या जड दागिन्यांने तिच्या सुंदरतेमध्ये आणखी भर घातली आहे. असा हा स्टायलिश लूक करून, प्रिया एकापेक्षा एक पोझेस देताना दिसली आहे. तिने या फोटोशूटचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिचा हा कॉन्ट्रास्ट लूक पाहून चाहत्यांच्या प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत.

प्रिया प्रकाश वारियरला तिच्या डोळ्यांनी ओळख मिळवून दिली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तिच्या डोळ्यांच्या इशाऱ्याच्या व्हिडिओने तिला देशभर प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. प्रिया प्रकाशने तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात मल्याळम चित्रपट ‘ओरू अदार लव’ पासून केली. यातील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली. तिचा ‘चेक’ हा चित्रपट २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. हा तिचा पहिला तेलुगु चित्रपट आहे.

आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर प्रिया प्रकाश लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती ‘लव्ह हॅकर्स’च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, तिचे एक यूट्यूब चॅनलही आहे, ज्यावर ती आपल्या गाण्याचे व्हिडिओ पोस्ट करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी शांत बसणार नाही…’, आमिर खानसोबत काम केलेल्या अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, भाजपवर मोठा आरोप

-‘मलाही राग आला होता…’, म्हणत हिमांश कोहलीने पहिल्यांदाच केला नेहा कक्करसोबतच्या ब्रेकअपवर खुलासा

-‘नृत्याने अंधार आणि वेदनाविरुद्ध लढण्यास मिळते मदत’, म्हणत अभिनेत्री संदीपा धरने नृत्य दिनानिमित्त केला आयुष्यातील मोठा खुलासा

-रेमो डिसूजाने पत्नी लिजेलसोबत केला मजेशीर व्हिडिओ शूट, पाहून तुम्हीही खदखदून हसाल

हे देखील वाचा