Saturday, June 29, 2024

प्रिया वॉरियर ते दिशा पाटणी! रातोरात ‘नॅशनल क्रश’ झालेल्या पाच अभिनेत्री

मंडळी प्रत्येक मुलाची एक ना एक अभिनेत्री ही क्रश असतेच असते आणि अगदी हेच मुलींच्या बाबतीतही होतं. प्रत्येक मुलीचा एक ना एक अभिनेता क्रश असतोच असतो. बरं जे कलाकार जितक्या जास्त जणांचे क्रश असतात अखेरीस ते नॅशनल क्रश म्हणून ओळखले जातात. हे क्रश प्रकरण काही आत्ताचं नाही तर फार पूर्वी पासून चालत आलेलं आहे.

पूर्वी सिनेमाचे पोस्टर्स किंवा वृत्तपत्रातील कात्रणांमधून प्रत्येक जण आपापल्या क्रशची छबी स्वतःजवळ जपून ठेवत असे. पण आज तसं नाहीये. आजचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. या सोशल मीडियामुळे सगळं काही अगदी सोपं झालं आहे. बेडरूमच्या भिंतींवरील पोस्टर्स आणि कात्रणांची जागा आता हातात असलेल्या स्मार्टफोनमधील एखाद्या फोल्डरमध्ये आलीये.

एखादी अभिनेत्री तिच्या अदाकारीने लाखो तरुणांना अशी काही भुरळ पाडते की पुढील काही दिवस अथवा महिने सर्वांच्या ओठी फक्त तिचंच नाव असतं. सध्या भारताची नॅशनल क्रश कोण आहे ? हो माहितीये आपल्याला सुद्धा ठाऊक आहे ते… रश्मीका मंदाना! पण तिच्या सोबत आणखी काही अभिनेत्री नॅशनल क्रश बनू पाहत आहेत आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

प्रिया प्रकाश वॉरियर
तुम्हाला आठवत असेलच की प्रियाचा काही सेकंदांचा व्हिडिओ ज्यामध्ये ती डोळे मारते. ओरू अदार लव या चित्रपटाचा हा व्हिडिओ पाहता क्षणीच व्हायरल झाला होता आणि प्रियाने लाखो तरुणांची मने जिंकली होती. २४ तासांच्या आत, इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या १० लाखांवर पोहोचली होती. त्यावेळी प्रिया खऱ्या अर्थाने नॅशनल क्रश झाली होती.

संजना सांघी
दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या दिल बेचारात संजना सांघी दिसली. त्याआधी ती हिंदी मिडीयम चित्रपटात दिसली होती पण त्यावेळी तिला फारशी ओळख मिळाली नव्हती. तिला खरी ओळख मिळाली ती गेल्या वर्षी आलेल्या दिल बेचारा चित्रपटामुळे! आयएमडीबी वर या चित्रपटाला सर्वोत्तम रेटिंग्ज मिळाल्या होत्या. संजना ही सोशल मिडियावरही तितकीच ऍक्टिव्ह असते आणि तिचे हॉट आणि बोल्ड फोटोज पोस्ट करत असते. याच फोटोंमुळे सध्या सोशल मीडियावर संजनाचा बोलबाला आहे.

मनुषी छिल्लर
एका भारतीय मुलीने २०१७ मध्ये १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मिस वर्ल्डचं जेतेपद आपल्या नावे केलं होतं. त्या मुलीचं नाव होतं मनुषी छिल्लर! मनुषी वैद्यकीय विद्यार्थिनी देखील राहिली आहे. मनुषी ही ब्युटी विथ ब्रेनचं उत्कृष्ट उदाहरण आहे. तिने मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकल्यानंतर रात्रभरात सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते वाढले. मनुषी छिल्लर लवकरच अक्षय कुमार स्टारर पृथ्वीराज या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दिशा पाटणी
एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी या पहिल्याच चित्रपटानंतर दिशा पाटणी एका रात्रीत लाखो तरुणांच्या दिलाची धडकन झाली होती. तीच्या गोंडस आणि निरागस लुकने बऱ्याच जणांना भुरळ पाडली होती. त्यानंतर लवकरच प्रेक्षकांनी तिला अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये पाहिलं. ती सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते आणि नियमितपणे तिचे फोटो पोस्ट करत असते. सध्या ती सलमान खान सोबत राधे या सिनेमात काम करतेय.

शर्ली सेतिया
शर्ली सेतिया निकम्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यूट्यूबवर गाण्याचं पोस्टर प्रसिद्ध झाल्याबरोबर तीला प्रसिद्धी मिळाली आहे. शर्ली सेतिया मैफिलींमध्ये लाइव्ह परफॉर्मन्सही देते. ती केवळ २४ वर्षांची आहे आणि आतापासूनच सोशल मीडियावर तरुणांच्या मनावर राज्य करतेय.

हे देखील वाचा