Friday, July 5, 2024

आयपीएलच्या मैदानातून सुरू झाली होती इनिंग, ‘फॅमिली मॅन’ फेम प्रियामणीची अशी आहे भन्नाट लवस्टोरी

प्रियामणी (Priyamani) ही दाक्षिणात्य सिनेजगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘द फॅमिली मॅन’मधून घरोघरी प्रसिद्ध झालेली प्रियामणी ३८ वर्षांची झाली आहे. प्रियामणी अनेक वर्षांपासून अभिनय करत असून ती दक्षिणेतील एक मोठे नाव आहे, परंतु मनोज बाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजने हिंदी प्रेक्षकांमध्ये तिची ओळख झाली. प्रियामणीची अभिनय कारकिर्दि खूपच प्रभावी राहिली आहे. शालेय जीवनापासूनच तिने मॉडेलिंगमध्ये पाऊल ठेवले आणि त्यानंतर अभिनय जगतात पाऊल ठेवले. प्रियाची अभिनय कारकिर्द जितकी रंजक आहे तितकीच तिची प्रेमकथाही आहे. प्रियामणी आणि मुस्तफा राज यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेऊया.

मुस्तफाची अभिनेत्री प्रियामणीसोबत पहिली भेट बंगळुरूमध्ये झाली होती जिथे ती आयपीएल टीमला चिअर करण्यासाठी गेली होती. प्रियामणी या आयपीएल संघाची ब्रँड अम्बेसेडर होती तर मुस्तफा राज त्याच वेळी त्या स्पर्धेचा इव्हेंट मॅनेजर होता. तेव्हा दोघांची भेट अगदी अनौपचारिक होती. यानंतर दोघेही काही कामानिमित्त केरळमध्ये भेटले. पण तरीही त्यांची भेट अत्यंत औपचारिक होती. मग काय, ही भेटीची मालिका वाढली आणि हळुहळु त्यांची प्रेमकथा बहरत गेली.

मुस्तफा राज आणि प्रियामणी लग्नाआधी ५ वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचेही प्रेम वाढत गेले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा विचारही केला होता, परंतु प्रकरण पुढे जाण्याआधीच मुस्तफाने डी फॉर डान्स या रिअलिटी शोमध्ये सर्वांसमोर प्रियमणीला लग्नासाठी प्रपोज केले. प्रियामणीलाही तेच हवे होते, त्यामुळे २०१६ मध्ये एंगेजमेंट झाल्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी लग्न केले. सध्या एकत्र आनंदी आयुष्य जगत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा