प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या घरी नुकतेच एक छोटी परी आली आहे. त्यांनी सरोगरीद्वारे त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला आहे. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही गोड बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली. अशातच प्रियांकाची आई डॉक्टर मधू चोप्राने खुलासा केला आहे की, प्रियांका आणि निकने त्यांच्या मुलीचे नाव ठेवले आहे. शनिवारी (२६ फेब्रुवारी) रोजी मधू चोप्रा यांच्या क्लिनिक ल १४ वर्ष पूर्ण झाले आहेत. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी मिडियाशी संवाद साधला.
मधू चोप्रा यांनी त्याच्या नातीच्या जन्माबद्दल सांगितले की, “मला आजी झाल्याचा खूप आनंद आहे. मी यावेळी केवळ स्माईल करत आहे. मी खूप खुश आहे.” जेव्हा त्यांना विचारले की, बाळाचे नाव काय ठेवले आहे. यावर तिने उत्तर दिले कि, “अजून नाव ठेवले नाही. जेव्हा पंडित त्याचे नाव काढतील तेथून पुढे त्याचे नाव ठेवले जाईल.”
प्रियांका आणि निकने ही गूड न्यूज देताना सोशल मीडियावर लिहिले होते की, “आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आम्ही सरोगसीद्वारे आई बाबा झालो आहोत. आम्ही आता आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत आहोत.” प्रियांका आणि निकचे लग्न २०१८ साली झाले आहे. निक हा एक अमेरिकन सिंगर आहे. खास म्हणजे तो प्रियांकापेक्षा खूप लहान आहे. त्यामुळे या जोडीला अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. परंतु प्रियांकाने या गोष्टींकडे कधीच जास्त लक्ष दिले नाही.
तिने तिचे करीअर केवळ बॉलिवूडपुरता मर्यादित ठेवता तिच्या अभिनयाचा डंका हॉलिवूडमध्ये देखील वाजवला. हॉलिवूडमध्ये तिने या आधी ‘द मॅट्रिक्स’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच बॉलिवूडमध्ये फराहन अख्तर याचा आगामी चित्रपट ‘जी ले जरा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ दिसणार आहे. बऱ्याच दिवसांनी प्रियांकाला बॉलिवूडमध्ये बघण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत.
हेही वाचा :