Tuesday, July 9, 2024

‘बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स’मध्ये प्रियांका चोप्राचा ग्लॅमरस अवतार पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका! पती निक जोनाससोबत मारली दमदार एन्ट्री

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे जोडपे नेहमीच चर्चेत असते. जगभरात त्यांची भलीमोठी फॅन फॉलोविंग आहे. मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये प्रियांका आणि निकचे फोटो, रेड कार्पेट लूक आणि त्यांचा स्टायलिश अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. आता बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स २०२१ मधील प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. २३ मे रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले फोटो
‘बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स २०२१’ मध्ये प्रियांका चोप्रा न्यूड कलरच्या शिमरी थाई-हाय स्लिट आउटफिटमध्ये दिसली. या फोटोंमध्ये निक जोनासदेखील प्रियांकासोबत दिसला. त्याने हिरव्या रंगाची पँट, शर्ट आणि जॅकेट परिधान केलेले पाहायला मिळाले.

सोहळ्यात सादरकर्ता म्हणून सहभागी झाली प्रियांका
बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्समध्ये प्रियांका चोप्रा केवळ पती निक जोनासला पाठिंबा देण्यासाठीच आली नव्हती, तर ती एक सादरकर्ता म्हणून देखील या शोमध्ये सामील झाली होती. तसेच, प्रियांका बर्‍याच दिवसांनी अमेरिकेत दिसली आहे.

लंडनमध्ये राहतेय प्रियांका
प्रियांका चोप्रा कामाच्या संबंधात बर्‍याच दिवसांपासून लंडनमध्ये राहत होती. निक जोनास काही दिवसांपूर्वी आपल्या कामासाठी अमेरिकेत राहत होता. मात्र, प्रियांका जास्त दिवस अमेरिकेत न राहता, लवकरच लंडनला परतणार आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे जगातील प्रसिद्ध विवाहित जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांनी डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केले होते. दोघेही आपापल्या कलागुण आणि क्षेत्रात पारंगत आहेत. प्रियांका चोप्रा आता जागतिक अभिनेत्री म्हणून, परदेशातही तिच्या यशाने धमाल करत आहे, तर निक जोनास पूर्वीपासूनच एक प्रसिद्ध गायक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा