Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

काय सांगता! प्रियांका चोप्राने अनेकदा केला होता आत्महत्येचा प्रयत्न, तिच्या मॅनेजरनेच केला खुलासा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांकाने तिच्या प्रतिभेच्या जोरावर जागतिक ओळख मिळवली असून, हॉलिवूडमध्ये देखील मोठे नाव कमावले आहे. देसी गर्ल असणाऱ्या प्रियांकाला आज यशाची ग्यारंटी म्हणून ओळखले जाते. आज ती अमेरिकेमध्ये तिचा नवरा निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत आलिशान जीवन जगत आहे. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यात अतिशय सुखात आहे. मात्र तिच्या आयुष्यात एक अशी वेळ आली होती, जेव्हा तिने तिचे जीवन संपवण्याचा देखील प्रयत्न केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाने तिच्या आयुष्यात मिळणाऱ्या सततच्या नाकारांमुळे हताश आणि निराश होऊन स्वतःचे जीवन संपवण्याचा विचार केला होता. एवढेच नाही तर तिने तिच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. याचा खुलासा प्रियांकाचा माजी मॅनेजर असलेल्या प्रकाश जाजू यांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी प्रकाश जाजू यांनी ट्विट केले होते, ज्यात त्यांनी प्रियांकाच्या आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाबद्दल सांगितले होते. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले होते, “आज अतिशय शक्तिशाली दिसणाऱ्या प्रियांकाने तिच्या संघर्षांच्या दिवसांमध्ये २/३ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी तिला अडवले होते. प्रियांका आणि तिचा जुना मित्र बॉयफ्रेंड असीम मर्चंट यांच्यात खूप भांडणं व्हायची. तेव्हा अनेकदा प्रियांका रात्रभर चिंतेत असायची आणि मला बऱ्याचदा फोन करायची.”

त्यांनी पुढे लिहिले, “एकदा असीमसोबत भांडण झाल्यानंतर प्रियांका एकदा गाडी चालवत मुंबईतील वसई भागात आली आणि तिने तिथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तसे पाहिले तर प्रियांका असीमच्या आईच्या खूपच जवळ होती. मात्र २००२ साली असीमच्या आईच्या मृत्यूनंतर तिने एका बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. तेव्हा प्रियांकाला खुर्चीला बांधून ठेवावे लागले होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

तत्पूर्वी आता तर सर्वानाच माहित आहे की, प्रियांका आणि तिचे पहिले मॅनेजर प्रकाश जाजू यांच्यासोबत वाद आहेत. प्रियंकाने प्रकाश अचानक आपले सर्व कॉन्ट्रॅक्ट तोडले होते. तर तिच्या वडिलांनी प्रकाशवर प्रियांकाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा आरोप करत त्यांच्यावर केस टाकली होती. ते ६७ दिवस तुरुंगात देखील होते. मात्र आता सर्व सुरळीत आहे. प्रियांका देखील तिच्या आयुष्यात पुढे गेली असून, यशस्वी झाली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर
‘विवाह’ फेम पूनम म्हणजेच अभिनेत्री अमृता राव एका जाहिरातीसाठी घेते एवढे पैसे; करोडो संपत्तीची आहे मालकीण 

हे देखील वाचा