Saturday, July 6, 2024

टोकियो ऑलिंपिक: मेरी कोमच्या मेहनतीचे कौतुक करत प्रियांका चोप्राने केली पोस्ट; मोठ्या पडद्यावर साकारलीय तिची भुमिका

या दिवसात संपूर्ण जगात टोकियो ऑलिंपिक स्पर्धेची चर्चा चालू आहे. मीराबाई चानू हिच्या विजयानंतर भारतीयांची नजर पुन्हा एका मेडलवर आहे. पण मागील दिवसात भारताला मेडल मिळाले नाही. गुरुवार (२९जुलै) हा दिवस तर भारतीयांसाठी खूप निराशाजनक ठरला. कारण या दिवशी बॉक्सर मेरी कोम मेडल जिंकण्यात यशस्वी झाली नाही.

मेडल न जिंकल्याचे दुःख तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते. बॉक्सिंगमध्ये सहा वेळा विश्व चॅम्पियन राहिलेल्या मेरी कोमला भलेही मेडल मिळाले नाही. पण तिने लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. पंतप्रधानांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सगळे तिचे कौतुक करत आहेत. नुकतेच देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने एक पोस्ट करून मेरी कोमचे कौतुक केले आहे. (Priyanka Chopra called mary com a champion after she suffered defeat in tokyo Olympics)

प्रियांका चोप्रा लिहिले आहे की, “एक महान चॅम्पियन असाच दिसतो. खूप छान मेरी कोम. आज तू हे सर्वांना दाखवून दिले आहे, की इच्छाशक्ती आणि मेहनतीने आपण आपले ध्येय प्राप्त करू शकतो. तू मला प्रत्येक दिवशी प्रेरित केले आहे. मला नेहमीच तुझा अभिमान वाटतो.” सगळेजण आता तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. प्रियांका चोप्राने पडद्यावर मेरी कॉमचे पात्र निभावले होते.

केवळ प्रियांका चोप्रा नाही तर अभिनेता फरहान अख्तरने देखील मेरी कोमला चॅम्पियन असे संबोधले आहे. त्याने लिहिले आहे की, “मेरी कोम तू खूप छान लढली आहे. तू एक चॅम्पियन आहे.” अभिनेता फरहान अख्तरने त्याच्या ‘तूफान’ चित्रपटात बॉक्सरची भूमिका निभावली आहे.

रणदीप हुड्डा देखील मेरी कोमचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी म्हणाला की, “खूप छान लढली आहे. ही लढाई कोणत्याही दिशेने जाऊ शकत होती. तू एक चॅम्पियन आहे. मॅचसाठी धन्यवाद.” रणदीप हुड्डासोबत इतर अनेक कलाकारांनी देखील तिचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पोस्ट केली आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?

-‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप

-पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी

हे देखील वाचा