प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हॉलिवूड तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये सतत काम करत आहे. दरम्यान, प्रियांकाने अलीकडेच एका मुलाखतीत बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री कोण आहेत? हे सांगितले. विशेष म्हणजे या यादीत दीपिका पदुकोणचे (Deepika Padukone) नाव नव्हतेच!
मुलाखतीत उघड केली गुपितं
यादरम्यान प्रियांका चोप्रा आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफसोबतच्या तिच्या आगामी ‘जी ले जरा’ या चित्रपटाबद्दलही बोलली. यावेळी प्रियांका चोप्राने आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ यांना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री म्हटले. (priyanka chopra calls alia bhatt katrina kaif top actresses of india)
काय म्हणाली प्रियांका चोप्रा?
प्रियांका चोप्रा म्हणाली, “मी भारतातील टॉप २ अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत एक चित्रपट करत आहे. यासोबतच आम्हा तिघींनीही चित्रपट करून त्याची निर्मिती करण्याचे ठरवले. होय, जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा ते खूप कठीण वाटले. बरं, चित्रपटांमध्ये आम्ही नेहमीच एकमेकांच्या विरोधात असतो. आमची कास्टिंग चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्यावर अवलंबून होती. त्यावेळी मागणी काय असेल यावरही अवलंबून आहे.”
फरहान, झोया आणि रीमा यांनी कथा लिहिली
‘जी ले जरा’ या चित्रपटाची घोषणा प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर केली होती. या चित्रपटाची कथा फरहान अख्तर, झोया अखर आणि रीमा यांनी लिहिली आहे. मात्र, या चित्रपटाची कथा काय आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अखेरची ‘द स्काय इज पिंक’ या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात प्रियांकाच्या सोबत फरहान अख्तर होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा