बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर शूटिंगशी संबंधित फोटो शेअर करते. नुकताच प्रियांकाने तिचा असा एक फोटो शेअर केला आहे, ज्या पाहून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. प्रियांकाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावरून रक्त वाहताना दिसत आहे. सुरुवातीला चाहत्यांना वाटले की, प्रियांकाने शूटिंगसाठी या प्रकारचा मेकअप केला असावा, पण या फोटोमध्ये प्रियांका चोप्राच्या चेहऱ्याला झालेल्या खऱ्या जखमाही पाहायला मिळतील.
खरं तर, प्रियांका चोप्राने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर चिखल लागलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या कपाळावरून रक्त वाहताना दिसत आहे. प्रियांकाने फोटो शेअर करत लिहिले आहे की, शूटिंग दरम्यान तिला ही दुखापत झाली आहे. तिच्या आगामी ‘सिटाडेल’ चित्रपटाच्या सेटवर शूटिंग करताना त्याला ही दुखापत झाली. (priyanka chopra gets hurt on the sets of citadel shares pics)
हा फोटो शेअर करत प्रियांकाने तिच्या लिहिले की, “तो एक अतिशय विस्कटलेला दिवस होता, मी तुम्हाला याची ओळख करून देण्यासाठी खूप उत्सुक आहे.” हे फोटो पाहून तिचे चाहते काळजीत पडले आहेत. चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. एवढेच नाही तर, हे फोटो पाहून तिचे चाहते खूप अस्वस्थ झाले आहेत.
प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘सिटाडेल’ या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल ७’ मध्येही दिसू शकते. हॉलिवूडनंतर प्रियांका कॅटरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत ‘जी ले जरा’ या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये तिचे ‘सोना’ रेस्टॉरंट देखील उघडले आहे, ज्यामध्ये भारतीय खाद्यपदार्थ दिले जातात. विशेष म्हणजे, तेथील नागरिकांना ते खूप पसंत पडलं आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तरुणींनाही लाजवेल असं आहे तिचं सौंदर्य! पाहा सिल्व्हर आऊटफिटमध्ये श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज
-‘बिग बीं’च्या घरात निर्माण झालीय पाण्याची समस्या? ब्लॉगमध्ये कामाबद्दल व्यक्त केली चिंता