Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड ‘मला तुझ्या लग्नाला का नाही बोलावलं, मी तर…?’ चाहत्याच्या प्रश्नावर प्रियांकाने दिले मजेशीर उत्तर

‘मला तुझ्या लग्नाला का नाही बोलावलं, मी तर…?’ चाहत्याच्या प्रश्नावर प्रियांकाने दिले मजेशीर उत्तर

बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपलं नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. ती नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. नेहमीच ती तिचा पती निक जोनाससोबतचेही फोटो शेअर करताना दिसते. सोबतच ती सामाजिक मुद्द्यांवर तिचे मत मांडत असते. यातच तिच्या एका चाहत्याने तिला एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचे तिने मजेशीर अंदाजात प्रत्युत्तर दिले आहे.

ट्विटरवर एका चाहत्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिला एक प्रश्न विचारला. त्याने ट्वीट करत म्हटले की, “तू मला तुझ्या लग्नाला का नाही बोलावलं? मी तर त्यावेळी जोधपूरमध्येच होतो.” तिच्या चाहत्याने विचारलेला हा प्रश्न आणि त्यावर प्रियांकाने दिलेले उत्तर सर्वत्र चर्चित आहे. प्रेक्षकांना देखील तिचे हे उत्तर खूपच आवडले आहे.

https://twitter.com/santoshpatnaik/status/1375490624971972616

प्रियांकाने हे ट्वीट रिट्विट करत म्हटले की, “मला माफ कर संतोष, कदाचित मी तुला ओळखत नाही म्हणून मी तुला बोलावलं नसेल.” यासोबत तिने एक हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे. तिच्या सर्व चाहत्यांना तिचा हा उत्तर देण्याचा अंदाज खूपच आवडला आहे. अनेकजण यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत.

प्रियांका आणि निक बॉलिवूड आणि हॉलिवुडमधील एक प्रसिद्ध जोडपे आहे. मागच्या दोन वर्ष पासून ते दोघे त्याचे वैवाहिक आयुष्य मजेत जगत आहे. लॉकडाऊनमध्ये निक आणि प्रियांकाने एकमेकांसोबत खूप वेळ घालवला. त्याच्या या रोमँटिक अंदाजातील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर देखील शेअर केले होते.

नुकतेच प्रियांकाचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे. ज्यामुळे ती सर्वत्र चर्चेत आहे.

 

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग लंडनमध्ये झाली आहे. तसेच तिचा ‘वी कॅन बी हिरो’ हा चित्रपटही मागील वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलियानंतर राम चरणचा ‘या’ चित्रपटातील लूक व्हायरल, मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

-‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री पडली होती टीव्हीवर भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात, १६ व्या वर्षी निभावले होते सूनेचे पात्र

-चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित

हे देखील वाचा