Monday, July 1, 2024

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या साखरपुड्यावर प्रियांकाच्या आईने दिली प्रतिक्रिया म्हणाल्या…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या परिणीती चोप्राची सध्या चांगलीच चर्चा आहे. आज १३ मे रोजी परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा ए साखरपुडा करत आहे. मागील बऱ्याच काळापासून हे दोघं नात्यात असल्याचे समजत आहे. शिवाय सतत त्यांना एकत्र विविध ठिकाणी स्पॉट केले जात होते. या दोघांकडून त्यांच्या नात्याबद्दल किंवा त्यांच्या साखरपुड्याबद्दल काहीही अधिकृत माहिती आली नाही. मात्र यातच आता परिणितीची चुलत बहीण असलेल्या प्रियांका चोप्राच्या आईने मधु चोप्रा यांनी या साखरपुड्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चोप्रा यांच्या साखरपुड्याबद्दल सतत मीडियामध्ये बातम्या येत आहेत. यातच आता मधू चोप्रा यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील गाजत आहे. मधू चोप्रा यांनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले, “परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यामुळे मी खूपच आनंदी आणि उत्साही आहे. आमचा आशीर्वाद नेहमीच त्यांच्यासोबत असणार आहे.” आता मधु चोप्रा यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा दिल्लीतील कपूरथला हाऊस, येथे धुमधडाक्यात पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मंडळी उपस्थित राहणार असून, बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रादेखील दिल्लीत दाखल झाली आहे.

बॉलिवूडमधून करण जोहर, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, सानिया मिर्जा, अर्जुन कपूर, मलाइका अरोरा, फराह खान यांचा समावेश पाहुण्यांमध्ये आहे. तर राघव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही साखरपुड्यासाठी आमंत्रित केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

मैत्रिणीच्या बर्थडेला गेली अन् तिच्या भावाला पाहून अमृताचीच विकेट पडली! जाणून घ्या तिची लव्ह स्टोरी आणि पतीबद्दल

झोपेतून उठला आणि थेट उर्मिलाच्या प्रेमातच पडला, वाचा उर्मिला आणि आदिनाथ यांची भन्नाट प्रेमकहाणी

हे देखील वाचा