Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड ‘मी अधिक मजबूत झाली’, म्हणत सरोगसीवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रियांकाने दिले सणसणीत उत्तर

‘मी अधिक मजबूत झाली’, म्हणत सरोगसीवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रियांकाने दिले सणसणीत उत्तर

ग्लोबल आयकॉन असलेली प्रियांका चोप्रा सतत या ना त्या कारणामुळे प्रकाशझोतात येत असते. सध्या प्रियांका तिचे मदरहूड एन्जॉय करत आहे. मागच्यावर्षी प्रियांकाने ती आई झाली असून, तिने एका मुलीला जन्म दिला असल्याचे जाहीर केले. २०१८ साली आपल्यापेक्षा १० वर्ष लहान हॉलिवूड अभिनेता असलेल्या निक जॉनसासोबत लग्न केल्यानंतर प्रियांका तुफान गाजली. तिला वयातील अंतरावरून ट्रोल केले गेले. त्यानंतर सर्व आलबेल होते. मात्र प्रियांकाने ती सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्याचे सांगितल्यावर पुन्हा एकदा तिच्यावर टीका झाली. मात्र प्रियांकाने यावर कधीच काही प्रतिक्रिया दिली नाही. आता जवळपास एका वर्षानंतर तिने एका मुलाखतीमध्ये याबद्दल भाष्य केले आहे.

या मुलाखतीमध्ये प्रियांकाने सांगितले, “माझ्यात काही वैद्यकीय समस्या होत्या. त्या काही कारणांमुळे मी आई होऊ शकत नव्हते. त्यामुळे आमच्याजवळ बाळासाठी सरोगसी हाच एकमेव पर्याय होता. हा माझ्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा भाग होता. मी स्वतःला खूप नशीबवान समजते की मला सरोगसीद्वारे आई होता आले. मी माझ्या सरोगेटची देखील आभारी आहे. तिने आमच्या अनमोल अशा बाळाची सहा महिने काळजी घेतली. ती खूपच छान आणि प्रेमळ आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by British Vogue (@britishvogue)

पुढे सरोगसीच्या प्रवासाबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, “तुम्हाला कोणाचं काही माहित नाही. आम्ही कोणत्या गोष्टींमधून गेलो आहोत. मला जेव्हा ट्रोल केले जाते, तेव्हा मी अधिक मजबूत बनते. मात्र जेव्हा माझ्या मुलीला ट्रोल केले जाते तेव्हा मला नक्कीच त्याचा त्रास होतो. तुम्हाला काहीच माहित नसताना देखील लोकं त्यावर कमेंट्स करतात. मालती जेव्हा झाली तेव्हा ती माझ्या तळव्यापेक्षा जास्त लहान होती. डॉक्टर तिच्या नसा शोधायचे तेव्हा तिचे छोटे हात मी माझ्या हातात घेतले होते. मालती कोणत्याही गॉसिपचा भाग बनणार नाही. मी माझ्या आयुष्यातील या फेजबद्दल आणि मालतीबद्दल खूप जास्त पझेसिव्ह आहे त्यामुळे मी यावर बोलणार नाही.”

पुढे प्रियांका म्हणाली की, “सरोगसीवरून मला गर्भ भाड्याने घेतला, प्रेग्नन्सी आऊटसोर्स केल्याबद्दल म्हटले गेले, रेडिमेड बाळ मिळाले देखील म्हटले गेले. अजून खूप काही बोले गेले मात्र या सर्व गोष्टींमुळे मी अधिकच मजबूत झाली आहे.” नुकतेच प्रियांकाने मालतीसोबत एक फोटोशूट केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठ्या दणक्यात सुरु आहे प्रभासच्या आगामी ‘सालार’ सिनेमाची शूटिंग, समोर आले फोटो
मोठी बातमी! बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया, प्रकृती गंभीर…

हे देखील वाचा