बॉलिवूडची देसी गर्ल अशी जीची ओळख आहे, ती प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. केवळ बॉलिवूडमध्ये नाही, तर हॉलिवूडमध्ये देखील तिने तिच्या अभिनयाचा डंका मिरवला आहे. ती अनेकवेळा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अभिनेत्रींसाठी त्यांचे कपडे, ज्वेलरी, मेकअप, सॅंडल्स या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण त्या कुठेही गेल्या तरी त्यांना स्पॉट करण्यासाठी खूप लोक असतात. त्यामुळे त्यांना नेहमीच अपडेट राहावे लागते.
आपण अनेकवेळा पाहिले असेल की, प्रियांकाला ज्वेलरीची खूप हौस आहे. अनेकवेळा ती फॅशनेबल ज्वेलरी घालते. एकदा तिला तिच्या आवडत्या ज्वेलरीबाबत विचारले होते. तेव्हा तिने हसत हसत उत्तर दिले होते की, “जर मी माझ्या साखरपुड्याची अंगठी असे उत्तर दिले नाही, तर माझा पती मला खूप मारेल.” (Priyanka Chopra says my husband Nick Jonas will kill me, know why)
प्रियांकाने पुढे सांगितले की, “खरंच माझी साखरपुड्याची अंगठी माझ्यासाठी खूप खास आहे. तिच्यासोबत माझ्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. त्यामुळे ती नेहमीच माझ्यासोबत राहील.”
त्यांच्या साखरपुड्याच्या अंगठीबाबत निकने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मला अशी अंगठी हवी होती जिचे माझ्या वडिलांशी नाते असावे. त्यावेळी मला वाटले की, ती अंगठी टिफणीची असावी.” हॉलिवूडमधील एका वृत्तानुसार प्रियांका चोप्राच्या या अंगठीची किंमत २ कोटी रुपये एवढी आहे.
प्रियांका चोप्रा आणि निकने २०१८ साली जोधपूरमध्ये ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. त्यानंतर त्यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये ग्रँड रिसेप्शन ठेवले होते.
त्या दोघांनी नुकतेच नवीन घर खरेदी केले आहे. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. दिवाळी निमित्त त्यांनी त्यांच्या घराची पूजा देखील केली. तेव्हा हे जोडपे पारंपारिक वेशात दिसत होते.
प्रियांका चोप्राच्या व्यावसायिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास ती लवकरच हॉलिवूड चित्रपट ‘मॅट्रिक्स’ आणि बॉलिवूड अभिनेत्री ‘जी ले जरा’ मध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा: या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफ दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-