Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘मी खोटे नाही बोलणार, माझे शरीर म्हातारे झालंय’, वाढत्या वयावर प्रियांकाचे वक्तव्य

‘मी खोटे नाही बोलणार, माझे शरीर म्हातारे झालंय’, वाढत्या वयावर प्रियांकाचे वक्तव्य

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा स्टाईल, आणि तिच्या आकर्षक दिसण्यामुळे कमालीची प्रसिद्ध आहे. निक जोनासशी लग्न झाल्यानंतर प्रियांका केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात चर्चेत आहे. बॉलिवूडबरोबर हॉलिवूडमध्येही तिने आपला जम चांगलाच बसवला आहे. ती बऱ्याचदा आपले सुंदर फोटो टाकून चाहत्यांना घायाळ करत असते. प्रियांकाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिची एक झलक बघण्याकरता चाहते आतुर असतात. वेगवेगळ्या कारणाने प्रियांका कायम चर्चेत असते. प्रियांका चोप्राने तिच्या एका मुलाखतीत आपल्या शरीराबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. गेल्या काही वर्षांत ती खूप बदलली आहे, असे तिला वाटते आहे.

प्रियांका म्हणाली की, तिच्या शरीरात बदल झाले आहेत. ती म्हणाली, “प्रत्येकाच्या शरीराप्रमाणेच माझे शरीरही म्हातारे झाले आहे, आणि मी हे मान्य केले आहे.”

प्रियांका चोप्रा ३८ वर्षांची झाली आहे. तिला असं म्हणायचं आहे की, तिच्याकडे आता ते शरीर नाही राहिले, ज्याचा वापर तिने काही दशकांपूर्वी केला होता. पण हा झालेला बदल, बाकी सगळ्यांच्याच शरीरातल्या बदलासारखा  सामान्य आहे. ती म्हणाली, “मी खोटे बोलणार नाही की, मला यामुळे काही फरक पडत नाही. माझे शरीर इतर लोकांप्रमाणे बदलले आहे. मला ते मानसिकरीत्यादेखील स्वीकारावे लागणारच होते. मी माझ्या आताच्या बदल होत असलेल्या शरीरासोबत आहे. १० किंवा २० वर्षांपूर्वीच्या शरीरासोबत नाही.”

ती पुढे म्हणाली, “मी नेहमीच विचार करते की, मी कसे पुढे येणाऱ्या वेळेला सामोरे जाईल? माझा हेतू काय आहे? मी चांगले काम करत आहे का? इतर गोष्टींबद्दल चांगले वाटण्यासाठी, मी नवनवीन गोष्टी करते, आणि मी जे काही करते त्याबद्दल मला आनंद होतो.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा