प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आणि निक जोनससाठी (nick jonas) मदर्स डे स्मरणात राहणारा ठरला आहे. या दिवशी त्यांनी त्यांची मुलगी मालती हिला रुग्णालयातून पहिल्यांदा घरी आणले. निक आणि प्रियांकाच्या मुलीचा जन्म प्री-मॅच्युअर झाला होता आणि या कारणास्तव तिला सुमारे १०० दिवस एनआयसीयू (नियो नेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट) मध्ये ठेवण्यात आले होते. प्रियांकाने आपल्या मुलीला रुग्णालयातून घरी आणल्यानंतर पहिल्यांदाच तिच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये त्याने मुलीला छातीशी धरले आहे आणि निकने मुलीचा हात पकडला आहे. या फोटोत मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. फोटो शेअर करताना प्रियांकाने मदर्स डे निमित्त एक लांबलचक नोट लिहिली आणि आई झाल्यानंतर आयुष्यात आलेल्या चढ-उतारांचा उल्लेख केला.
प्रियांकाने लिहिले की, “या मदर्स डेच्या निमित्ताने आम्हाला सांगायचे आहे की, गेले काही महिने आमच्यासाठी रोलर कोस्टर राईडसारखे होते. १०० दिवसांनंतर आमची मुलगी NICU (Neo Natal Intensive Care Unit) मधून घरी आली आहे. प्रत्येक कुटुंबाचा प्रवास हा अनोखा असतो आणि गेले काही महिने आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. माझ्या आयुष्यातील सर्व मातांना आणि काळजीवाहूंना मातृदिनाच्या शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी हा प्रवास सोपा केला. मला आई बनवल्याबद्दल निक जोनासचे आभार.”
निकने प्रियंका आणि मुलीचा तोच फोटोही शेअर केला आणि इंस्टाग्रामवर लिहिले, “माझ्या अविश्वसनीय पत्नी प्रियांकाला मदर्स डेच्या शुभेच्छा. तू मला प्रत्येक प्रकारे प्रेरणा देतेस, तू ही नवीन भूमिका अगदी सहजतेने स्वीकारली आहेस. या अद्भुत प्रवासाबद्दल धन्यवाद. तू एक अद्भुत आई आहेस. मदर्स डे च्या शुभेच्छा मी तुझ्यावर प्रेम करतो.” निक आणि प्रियांकाने या वर्षी जानेवारीमध्ये सरोगसीद्वारे मुलीचे पालक बनल्याचा खुलासा केला होता. २०१८ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. या गोष्टीची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव काय ठेवले आहे. हे देखील सांगितले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-