अमेरिकेमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून अमेरिकेच्या टेक्सास शहरातील एका शाळेत अंदाधुंद गोळीबार केला आहे. एका १८ वर्षाच्या मुलाने हा गोळीबार केला असून या गोळीबारात शाळेतील १८ मुले मृत्यूमुखी पडले आहेत. विद्याथ्यांसोबतच शाळेतील दोन शिक्षकांचाही या गोळीबारात मृत्यू झाला आहे. या दुर्देवी गोळीबाराच्या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त केला असून अनेकांनी यावर हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेबद्दल अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही (Priyanka Chopra) दुःख व्यक्त केले असून सोशल मीडियावर तिने याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अमेरिकेत घडलेल्या या दुःखद घटनेने जगभरातून हळहळ व्यक्त केले जात आहे. शाळेत शिकणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांना या हल्ल्यात नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यामुळे सर्व स्तरांतून दुःख व्यक्त केले जात आहे. एका १८ वर्षाच्या मुलाने शाळेत मशिनगनं आणत हा हल्ला केला. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही यावर शोक व्यक्त केला आहे. प्रियांकाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या दुखःद भावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या या स्टोरीमध्ये प्रियांकाने फक्त भावपूर्ण श्रध्दांजली म्हणून काहीच होणार नाही. यावर काहीतरी दुसरे उपाय करण्याची गरज आहे. खूपच दुखःद आहे. असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियांकाच्या या भावूक संदेशामुळे या हल्ल्याची दाहकता आणि भीषणता लक्षात येत आहे. या हल्लेखोरावर सुरक्षारक्षकांनी प्रत्युतरात केलेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यूही झाला आहे. याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायोडेन यांनीही शोक व्यक्त केला असून हे कधीही न भरुन निघणारे नुकसान आहे अशा शब्दात त्यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा