प्रियांका चोप्रा (priyanka chopra)आई झाल्यापासून तिच्या या छोट्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. प्रियांका आणि निक जोनासने एक-दोनदा मुलगी दाखवली पण तिचा चेहरा लपवला. या वर्षाच्या सुरुवातीला स्वत: प्रियांकाने सोशल मीडियावर सरोगसीद्वारे जन्मलेल्या मुलीच्या जन्माची माहिती देऊन चाहत्यांना खूश केले होते, मात्र अद्याप चेहरा दाखवण्यात आलेला नाही. पण सोशल मीडियावर ताजे फोटो शेअर करून मुलीचा चेहरा जवळपास दाखवण्यात आला आहे.
प्रियांका चोप्राने देसी स्टाईलमध्ये आपल्या मुलीचे नाव मालती ठेवल्यावरही खूप चर्चा झाली. आता पुन्हा एकदा आपल्या मुलीची झलक दाखवत तिने तिला देसी असल्याचे सांगितले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये मालतीला कोणीतरी पकडून ठेवलेले दिसत आहे, मात्र हा फोटो इतका जवळून काढण्यात आला आहे की संपूर्ण चेहरा दिसत नाही. मुलीचा फोटो शेअर करत हॅशटॅग करत ‘देसी गर्ल’ असे लिहिले.
प्रियांका चोप्राने यावेळीही मुलीचा पूर्ण चेहरा दाखवला नाही. प्रियांका आणि निक जोनास यांनी मदर्स डेच्या निमिताने सोशल मीडियावर आपल्या मुलीची ओळख करून दिली. मालती सुमारे जन्मानंतर 100 दिवस NICU मध्ये राहिली. अनेक सेलिब्रिटी प्रमाणे तिची लिटिल एंजेल मालती मेरी चोप्रा जोनासला रक्षाबंधनचा आनंद दिला आहे.
सोशल मीडियावर अनेकजण तिच्या मुलीचे कौतुक करत आहेत. तिचा संपूर्ण चेहरा चाहत्यांना दिसला नाही तरी देखील त्यांना प्रियांकाची मुलगी आवडली आहे. तसेच सगळेजण तिच्या मूळचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हेही वाचा –
रक्षाबंधनाचे औचित्य साधून प्रियांका चोप्राने दाखवला तिच्या मुलीचा चेहरा, एकदा पाहाच
सावत्र असूनही सख्ख्या बहीण भावांपेक्षा आहे जास्त प्रेम, ‘हे’ आहेत बॉलिवूडमधील भावंड
मलायकासोबत लग्न करण्याआधी अर्जुन कपूरला मिळवायची आहे ‘ही’ गोष्ट, स्वतः अभिनेत्याने केला खुलासा