प्रियांका चोप्राच्या दोन चुलत भावांचा कोरोनामुळे मृ्त्यू, बहीणीने साधलाय सरकारवर जोरदार निशाना


बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा इंडस्टीमधील एक दिग्गज कलाकार म्हणून ओळखली जाते. याच प्रियांकाची चुलत बहीण परिनीती चोप्रा आता सर्वांनाच परिचीत आहे. परंतू प्रियांकाची आणखी एक चुलत बहीण मीरा चोप्रा मात्र अनेकांना तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चांगली लक्षात आहे. मीरा सोशल मीडियावरील एक अ‍ॅक्टिव पर्सनालिटी म्हणून ओळखली जाते. आता याच मीरा कपूरच्या घरातील दोन अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींचे निधन झाल्याचे वृत्त आहे. याची माहिती खुद्द मीरानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

ही माहिती देताना मीराने देशातील आरोग्य सेवेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मीरा आपल्या पोस्टमध्ये म्हणतेय, “मी माझ्या खूप जवळच्या दोन भावांना कोरोनामुळे नाही, तर सरकारच्या कमकुवत आरोग्य व्यवस्थेमुळे गमावलं आहे. यापूर्वी माझ्या एका चुलत भावाला बंगळूरमध्ये सुमारे दोन दिवस, आयसीयू बेड मिळाला नाही, त्यानंतर दुसऱ्या भावाची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यान त्यांचे निधन झाले आहे. दोन्ही चुलत भावांचे वय ४० वर्षांच्या आसपास होते.”

“आम्ही त्या दोघांना वाचवण्यासाठी काहीच करू शकलो नाही, हे खूपच निराशजनक आहे. पुढे आता काय घडेल, या भीतीने मी जगत आहे. आता प्रत्येकाचे आयुष्य फक्त संपताना दिसत आहे. प्रथमच मला खूप राग येतोय की, देश खोल खड्ड्यात जात आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, इंजेक्शन्स, औषधे आणि बेड्स देऊ शकत नाही आहे. सरकार आमच्यासाठी अयशस्वी ठरल्याचे दिसत आहे,” असेही तीने पुढे म्हटले आहे.

हतबल होत तीने पायाभुत सुविधा निर्माण न केल्याबद्दल राज्यकर्त्यांवर चांगलाच निशाना साधला आहे. ती म्हणतेय, “पहिली लाट आल्यानंतर वैद्यकीय पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. त्या जर केल्या असत्या तर आपण साथीच्या आजाराचा सामना करू शकलो असतो. आता हे स्पष्टपणे निराश करणारे झाले की या काळात काहीही झाले नाही. नाहीतर दुसरी लाट नक्की थोपवता आली असती. मला हे सुद्धा माहित नाही की, मी आता काय अनुभवत आहे. कुटुंबात गेल्या १०दिवसात दोन मृत्यू झाल्यानंतर मला आता कोणतीही आशा दिसत नाही.”

 


Leave A Reply

Your email address will not be published.